JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुम्हाला कळलंच नाही, 6 दिवसांत हळूहळू इतकं महाग झालं पेट्रोल

तुम्हाला कळलंच नाही, 6 दिवसांत हळूहळू इतकं महाग झालं पेट्रोल

सलग सहा दिवसांमध्ये जवळपास पेट्रोल 3.34 तर डिझेल 3.42 रुपयांनी महाग झालं आहे.

जाहिरात

देशात कोरोनाचं संकट असतांना महागाईसुद्धा वाढली आहे. आर्थिक मंदीत सामान्य माणसांना मोठा फटका बसला आहे. अशा वातावरणात दिलासा देणारी बातमी आलीय.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जून : देशात कोरोना व्हायरसमुळे आधीच लॉकडाऊनदरम्यान अनेक उद्योगांना टाळं लागलं आहे. त्यामध्ये आता नुकताच अर्थव्यवस्थेचा एक टप्पा सुरू झाला असतानाच नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. सलग सहाव्या दिवशी इंधनाचे दर वाढले आहेत. PTI नं दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 59 पैशांची वाढ केली. शुक्रवारी प्रति लिटर 57 पैशांनी पेट्रोल वाढलं असून आजचा दर 74.57 रुपये आहे. सलग सहा दिवसांमध्ये जवळपास पेट्रोल 3.34 तर डिझेल 3.42 रुपयांनी महाग झालं आहे. महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर मुंबई : पेट्रोल- 81.53 रु. प्रति लीटर, डिझेल 72.81 रु. प्रति लीटर दिल्ली : पेट्रोल- 74.57 रु. प्रति लीटर, डिझेल 65.21 रु. प्रति लीटर कोलकाता : पेट्रोल- 76.48 रु. प्रति लीटर, डिझेल 71.14 रु. प्रति लीटर चेन्नई : पेट्रोल- 78.47 रु. प्रति लीटर, डिझेल 71.14 रु. प्रति लीटर हे वाचा- आणखी एक भारतीय संस्था Corona वरची लस बनवणार; अमेरिकन कंपनीशी झाला करार पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची समीक्षा केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता. IOC चे ग्राहक 9224992249 वर RSP असा, BPCL चे ग्राहक 9223112222 वर RSP आणि HPCL चे ग्राहक 9222201122 वर HPPRICE असा मेसेज करून ही माहिती मिळवू शकतात. हे वाचा- देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना रिलिफ फंडातून मिळणार 7500 रुपये? संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या