JOIN US
मराठी बातम्या / मनी / Petrol-Diesel Prices: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांना विकलं जातंय?

Petrol-Diesel Prices: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांना विकलं जातंय?

काही दिवसांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली होती, जेणेकरून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जून : तेल कंपन्यांनी आज मंगळवार, 7 जूनसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले आहेत. स्वस्त झाल्यानंतर सलग 16व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीतील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर आज पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आहे आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे. सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली होती, जेणेकरून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील. किमान 9.5 रुपये आणि 7 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. तेव्हापासून तेलाच्या किमती स्थिर आहेत. LIC शेअर होल्डर्सना Paytm ची आठवण; महिनाभरात एक लाख कोटींहून अधिक नुकसान तुमच्या शहराचे दर माहित आहेत? » दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर » मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर » कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर » चेन्नई- पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर » परभणी- पेट्रोल 114.38 रुपये तर डिझेल 98.74 रुपये » श्रीगंगानगर- पेट्रोल 113.49 रुपये आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर » पोर्ट ब्लेअर- पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर ‘पोस्टमन काका’ आता जनतेचा ‘आधार’ बनणार; काय आहे UIDAI ची योजना? तुमच्या शहराचे दर तपासा तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या