नवी दिल्ली, 28 जानेवारी : सध्या सर्वत्र डिजिटल ट्रान्झेक्शनला अधिक पसंती दिली जाते. त्यात पेटीएम युजर्स अधिक आहेत. परंतु, डिजिटल ट्रान्झेक्शन करताना अतिरिक्त पैसे मोजावे लागतात, अशी चर्चा नेहमीच सर्वसामान्यांमध्ये असते. पण या चर्चांना पेटीएमने पूर्णविराम दिला आहे. डिजिटल ट्रान्झेक्शन्सबाबतीत पेटीएमनं मोठा खुलासा केला आहे. डिजिटल ट्रान्झेक्शन्सवर कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जाणार नसल्याचं पेटीएमने स्पष्ट केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1 टक्के तर डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 0.9 टक्के रक्कम ग्राहकांना त्यांच्या खिशातून भरावी लागणार आहे. नेट बँकिंग आणि यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून ट्रान्झेक्शन्स केल्यास ग्राहकांना 12 ते 15 रुपयांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार आहे. पेटीएमने या चर्चांना पूर्णविराम देत; असा कोणताच प्लान नसल्याचं खुलासा कंपनीकडून करण्यात आला आहे. डिजिटल ट्रान्झेक्शन्सला चालना देण्यासाठी सरकारने दोन हजार रुपयांपर्यंतच्या ट्रान्झेक्शन्सवरील अतिरिक्त भार उचलण्याची घोषणा केली होती. हे नियम डेबिट कार्ड्स, भीम, युपीआई किंवा आधार एनबेल्ड पेमेंट सिस्टमवर लागू असल्याचंही सांगितलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमडीआरचा बोझा युजर्सवर पडणार असल्याचं सांगितलं जातं होतं. एमडीआर चार्ज म्हणजे काय? बँक आणि कंपन्या डिजिटल ट्रान्झेक्शन्ससाठी एमडीआर चार्ज करतात. तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास एमडीआर चार्ज केला जातो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या पेमेंट सुविधेसाठी आकारण्यात येणारी फीस आहे. सध्या पेटीएम आपल्या ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त रक्कम आकारत नसल्याचं सांगत आहे. पेटीएमचं स्पष्टीकरण कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता ग्राहकांनी पेटीएममधल्या सर्व सेवांचा लाभ घेणं सुरू ठेवावं, असं आवाहन पेटीएमकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, भविष्यातही आमची अतिरिक्त पैसे आकारण्याची कोणतीच योजना नसल्याचं पेटीएमने यावेळी स्पष्ट केलं.