मुंबई, 29 जुलै- पारले-जी बिस्किट माहिती नाही अशी व्यक्ती भारतात सापडणं अवघडच आहे. अगदी रोजंदारीवर काम करणारा एखादा कामगार असो, किंवा एखाद्या विमान कंपनीचा मालक असो सर्वच लोक पारले-जीचे चाहते आहेत. या बिस्किटांव्यतिरिक्त पारले कंपनी अन्य अनेक उत्पादनांची निर्मिती करते. यामुळेच पारले हा ब्रँड 2021 मध्येदेखील देशात ‘वेगाने वाढणारा कंझ्युमर प्रॉडक्ट’ ठरला आहे. कांतार इंडियाच्या वार्षिक ब्रँड फुटप्रिंट रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेली 10 वर्षं सलग पारले हा ब्रँड टॉपवरच राहिला आहे. सीआरपीच्या आधारावर रिपोर्ट कंझ्युमर रीच पॉईंट (CRP), म्हणजेच सीआरपीच्या आधारावर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कंझ्युमरने केलेली खरेदी, आणि एका कॅलेंडर वर्षात या खरेदीदारांची फ्रीक्वेंसी किती राहिली या आधारावर सीआरपी ठरवला जातो. कांतारच्या ब्रँड फुटप्रिंट रँकिंगचं हे 10वं वर्ष आहे. पारलेचा यंदाचा सीआरपी स्कोअर 6,531 मिलियन आहे. या स्कोअरसह पारले सलग दहाव्या वर्षी या यादीत टॉपला आहे.
दुसऱ्या नंबरवर अमूल, तर हल्दिराम टॉप 25 मध्ये या यादीमध्ये पारलेनंतर अमूल , ब्रिटानिया, क्लिनिक प्लस आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचा समावेश आहे. पॅकेज्ड फूड ब्रँड हल्दिरामदेखील या वर्षी बिलियन सीआरपीमध्ये सहभागी झाला. 24 वा क्रमांक मिळवत हल्दिरामने टॉप 25 मध्ये स्थान मिळवलं आहे. सोबतच बिस्किट आणि केक ब्रँड असलेले अनमोलदेखील सीआरपी क्लबमध्ये सहभागी झालं आहे. (**हे वाचा:** महिलांसाठी कामाची बातमी! नोकरी सोडून आत्मनिर्भर व्हायचंय ना? मग हे कोर्सेस करा आणि सुरू स्वतःचा बिझिनेस ) लॉकडाउननंतर सीआरपीमध्ये वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास सर्व ब्रँडच्या सीआरपीमध्ये भरपूर वाढ झाली आहे. लॉकडाउन कालावधी संपल्यामुळे असं दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे. पारलेच्या सीआरपीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 14 टक्के वाढ झाली आहे. अमूलच्या सीआरपीमध्ये 9 टक्के, तर ब्रिटानियाच्या सीआरपीमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे. काही स्नॅकिंग ब्रँडमध्येदेखील भरपूर वाढ झाली. यामध्ये बालाजी (49 टक्के), कुरकुरे (45 टक्के), बिंगो (37 टक्के) यांचा समावेश आहे. बेव्हरेज ब्रँडमध्ये नेसकॅफेच्या सीआरपीमध्ये 19 टक्के वाढ झाली, तर बूस्टच्या सीआरपीमध्ये 15 टक्के वाढ झाली आहे.ब्रँड फुटप्रिंट 2022 मध्ये 2021च्या रँकिंगचं मॅपिंग केलं. यामध्ये 400 हून अधिक फूड, होम केअर, आरोग्य आणि ब्युटी, बेव्हरेज आणि डेअरी उत्पादक ब्रँड्सचा समावेश आहे. या सर्व ब्रँड्सची एकूण सीआरपी 98 बिलियनएवढी आहे.