JOIN US
मराठी बातम्या / मनी / अरेरे! पाकिस्तानची दुरावस्था, 780 किलो चिकन तर 210 रुपये दूध

अरेरे! पाकिस्तानची दुरावस्था, 780 किलो चिकन तर 210 रुपये दूध

भारतावर कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानमध्ये जगणं मुश्कील झालं आहे, पाहा किती महाग झाल्यात जीवनावश्यक वस्तू, चेक करा लिस्ट

जाहिरात

Pakistan inflation

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कराची : कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानवर आता अतिशय वाईट वेळ आली आहे. रोखीच्या संकटात अडकलेल्या पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. सततच्या वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानातील जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झालं आहे. सध्या पाकिस्तानमध्ये चिकन 700 ते 780 रुपये किलोनं विकलं जात आहे. त्याचबरोबर एक लिटर दुधासाठी 210 रुपये मोजावे लागतात. पाकिस्तानचे वृत्तपत्र द डॉनने दिलेल्या माहितीनुसार दैनंदिन वस्तूंच्या किमती खूप वाढल्या आहेत. या किंमती पाकिस्तानी रुपयात आहेत. भारताचा एक रुपया पाकिस्तानच्या ३.२३ रुपयांच्या बरोबरीचा आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलची महागाई सातत्याने वाढत आहे. जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, 16 फेब्रुवारीपासून पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 20 रुपयांनी वाढ करण्यात आली. 1 जानेवारी 2023 रोजी, पाकिस्तान सरकारने पुढील 6 महिन्यांसाठी नैसर्गिक वायूच्या किमती 16% ने 112.32% पर्यंत वाढवल्या.

Canada Ram Mandir Defaced : कॅनडात राम मंदिराची विटंबना, भिंतीवर लिहिल्या भारत आणि मोदी विरोधी घोषणा

पाकिस्तान मंत्रिमंडळाच्या आर्थिक समन्वय समितीने (ECC) नैसर्गिक वायूच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. पाकिस्तानातील दुकानात सुटे दूध 210 ते 190 रुपये प्रतिलिटर दराने मिळते. कोंबडी घेतली तर त्याचे दर 30 रुपयांवरून 40 रुपये किलोपर्यंत वाढ झाली आहे. त्याची किंमत आता 480 ते 500 रुपये प्रतिकिलो झाली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या चिकनची किंमत 700 ते 780 रुपये किलो आहे.

तुर्कीनंतर आणखी एक देश शक्तीशाली भूकंपाने हादरला, सलग दुसरे अस्मानी संकट

संबंधित बातम्या

बोनलेस चिकनच्या किंमती सर्वोच्च असल्याची चर्चा आहे. बोनलेस चिकनला किलोमागे 1000-1100 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे नॉनवेज खाण्याचे शौक चांगलेच महागात पडणार आहेत. सिलिंडरचे दर दर 10 हजारांच्या आसापास पोहोचले आहेत. सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या