JOIN US
मराठी बातम्या / मनी / Nirav Modi: EDची मोठी कारवाई, नीरव मोदीची 253 कोटींची मालमत्ता जप्त

Nirav Modi: EDची मोठी कारवाई, नीरव मोदीची 253 कोटींची मालमत्ता जप्त

केंद्रीय एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की या सर्व जंगम मालमत्ता हाँगकाँगमध्ये आहेत आणि मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून जप्त करण्यात आल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जुले : फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीशी संबंधित कंपन्यांची हिरे, दागिने आणि बँक ठेवींसह एकूण 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्रीय एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की या सर्व जंगम मालमत्ता हाँगकाँगमध्ये आहेत आणि मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून जप्त करण्यात आल्या आहेत. निवेदनानुसार, हाँगकाँगमधील नीरव मोदी समूहाच्या काही मालमत्ता आढळली आहे. यासोबतच तिथल्या बँक खात्यांमध्ये ठेवलेल्या रकमाही समोर आल्या आहेत. फायद्याची बातमी! वस्तू बिघडल्यास कंपनीलाच रिपेअर करावी लागणार; केंद्राकडून नव्या कायद्याची तयारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार नीरव मोदीच्या मालमत्तेची तात्पुरती जप्ती करण्यात आली आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या दोन अब्ज डॉलर्सच्या फसवणुकीतील तो मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे. नीरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात बंद नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात बंद आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (पीएमएलए) अंतर्गत ECIR नोंदवून 6,498.20 कोटी रुपयांच्या PNB बँकेच्या फसवणूक प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. Monkeypox Cases in India : कोरोनासोबत भारतात आता मंकीपॉक्सही पसरतो हातपाय; आणखी एक रुग्ण सापडल्याने खळबळ नीरव मोदीने त्याचा काका मेहुल चोक्सी याच्यासोबत मिळून पंजाब नॅशनल बँकेत हेराफेरी केली होती. नीरव मोदी गीताजली या ब्रँड नावाने हिऱ्यांचा व्यवसाय करत आहे. नीरव मोदीशिवाय मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या, आयपीएलचे संस्थापक ललित मोदी हेही यावेळी ब्रिटनमध्ये आहेत. भारत सरकारने त्यांना फरारी म्हणूनही घोषित आहे आणि त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि फसवणूक केल्याप्रकरणी तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या