मुंबई, 16 सप्टेंबर : अनेकदा पर्सनल लोनवर जास्त व्याज द्यावं लागतं. तुम्हाला कमी व्याज दरावर पर्सनल लोन घ्यायचं असेल तर काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. कर्ज देणारा तुमच्या अनेक गोष्टी तपासून पाहतो. जाणून घेऊ त्याबद्दल- चांगला क्रेडिट स्कोअर ठेवा तुम्ही योग्य वेळी कर्ज फेडलंत तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. 750पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असणं चांगलं मानलं जातं. तुम्ही कर्ज फेडण्यासाठी उशीर केलात तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम पडतो. चांगली रिपेमेंट हिस्ट्री हवी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डाचं बिल योग्य वेळी जमा करा. दर महिन्याला कर्ज क्लियर ठेवा. तुम्हाला कर्जाचा EMI वेळेवर जमा करायला पाहिजे. तुमचं EMI पेमेंट नियमित दर महिन्याला करा. तुमची EMI पेमेंट हिस्ट्री चांगली असायला हवी. म्हणजे तुम्ही कमी व्याजाची मागणी करू शकता. व्याजाचा दर इतरांशी तुलना करून पाहा आणि सीजनल ऑफर्सबद्दल जाणून घ्या तुम्हाला कर्जाच्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या ऑफर्सची माहिती करून घ्यायला हवी. तुम्हाला ऑनलाइनही कळू शकतं की कोण कमी दरानं पर्सनल लोन देतंय ते. पर्सनल लोन घेताना तुम्हाला फक्त कमीत कमीत इंटरेस्ट रेट नाही तर सर्विस टर्मबद्दलही माहिती हवी. सणासुदीच्या वेळी पर्सनल लोनवर अनेक स्कीम्स आणि ऑफर्स असतात. त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. व्याज दराच्या कॅलक्युलेशनबद्दल माहिती करून घ्या अनेकदा कर्जाचा अवधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळतं की तुम्ही जास्त व्याज दिलंय. त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घ्या. तुम्ही नोकरी करत असलेल्या कंपनीचाही परिणाम तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत काम करत असाल तर पर्सनल लोन घेताना चांगलं डिल होऊ शकतं. कारण कर्ज देणारा हे बघतो की तुम्ही ज्या कंपनीत काम करता तिथून तुम्हाला नियमित पगार मिळतोय. भाजपच्या दबावाला शिवसेना झुगारणार, पाहा SPECIAL REPORT