JOIN US
मराठी बातम्या / मनी / सर्वसामान्यांना महागाईचा झटका, घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग

सर्वसामान्यांना महागाईचा झटका, घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग

दिल्ली ते मुंबई पाहा किती रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर, पाहा तुमच्या शहरातील दर

जाहिरात

LPG Gas

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : सर्वासामन्या लोकांच्या खिशाला झळ बसणारी बातमी आहे. या बातमीनंतर गृहिणींचं बजेट चांगलंच कोलमडणार आहे. दर महिन्याच्या 1 तारखेला LPG चे दर जाहीर होत असतात. मार्च महिन्यातील पहिल्याच दिवशी खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. महागाईनं सर्वसामान्य लोकांना आणि गृहिणींना मोठा झटका दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता मुंबईत सिलेंडरचे दर 1,102 रुपये 50 पैसे आणि नागपूरला 1,154 रुपये 50 पैसे झाले आहेत. होळीपूर्वी महागाईचे चटके सामान्य माणसाला बसणार आहेत. याशिवाय 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर ३५०.५० रुपयांनी वाढले आहेत. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढण्याची शक्यता आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत 1103 रुपयांना मिळणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 350 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत आजपासून 19.2 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी 2119.5 रुपये मोजावे लागणार आहेत.

यापूर्वी 6 जुलै 2022 रोजी तेल कंपन्यांनी दरात वाढ केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र त्यानंतर तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या