होम लोन
मुंबई, 4 मे : स्वतःच्या मालकीचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण सध्याच्या काळात प्रॉपर्टीच्या किमती पाहता घर घेता येईल एवढी बचत करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे बहुतांश लोक घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी होम लोन अर्थात गृहकर्जाची मदत घेतात. होम लोनच्या माध्यमातून तुम्हाला घरासाठी हवी असलेली रक्कम मिळते आणि तुम्ही ती नंतर सुलभ हप्त्यांमध्ये परत करू शकता. होम लोन घेतल्यावर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत करात सवलतदेखील मिळते. पण संयुक्त अर्थात जॉईंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे आहेत, या विषयी तुम्हाला माहिती आहे का? जॉईंट होम लोन घेताना जर महिला अर्जदार असेल तर त्यामुळे विविध फायदे मिळतात. तुम्ही तुमची पत्नी किंवा बहिणीला होम लोनसाठी जॉईंट अॅप्लिकंट बनवू शकता. जॉईंट होम लोनचे नेमके कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया. जॉईंट होम लोनचे फायदे जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉईंट होम लोनसाठी अर्ज केला तर सर्वांत मोठा फायदा म्हणजे दोघांचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअरच्या आधारे तुम्हाला योग्य व्याजदराने कर्ज म्हणून आवश्यक रक्कम सहज मिळू शकते. त्याचवेळी त्याचा एक फायदा असा आहे की होम लोनच्या बाबतीत तुम्ही दोघंही कलम 80C अंतर्गत आयकर सवलतीचा दावा करू शकता. दोन्ही अर्जदारांना व्याजावर दोन लाख रुपये तर मुद्दलावर पाच लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो. महिला अर्जदारांसाठी व्याजदर आहे कमी जर तुम्ही जॉईंट होम लोनसाठीच्या अर्ज प्रक्रियेत महिला अर्जदार सहभागी करून घेतल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळतात. होम लोनसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना बँका कमी व्याजदराने कर्ज देतात. हा दर साधारण होम लोनच्या व्याजदरापेक्षा 0.05 टक्के म्हणजेच पाच बेसिस पॉइंट्स कमी असतो. अशा प्रकारे, तुम्ही महिला अर्जदार म्हणून होम लोनसाठी अर्ज करून कमी व्याज दराचा फायदा मिळवू शकता. वाचा - नोटरी की रजिस्टर्ड रेंट अॅग्रीमेंट? कोणतं आहे बेस्ट? अवश्य घ्या जाणून एकाच व्यक्तीवर नसेल ईएमआय भरण्याचा भार जॉईंट होम लोन घेतल्यावर त्याची परतफेड करण्याचा भार कोणा एकालाच सहन करावा लागणार नाही. कारण यामुळे दोन्ही अर्जदारांची बँक खाती लिंक होतील, जेणेकरून कोणताही ईएमआय चुकणार नाही. परंतु, या साठी तुम्हाला एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. ते म्हणजे, ईएमआयच्या तारखेपूर्वी दोघांपैकी एकाच्या बँक खात्यात मासिक हप्ता भरण्यासाठी पुरेसे पैसे असले पाहिजेत.