मुंबई, 18 एप्रिल : करदाता अनेक प्रकारे कर वाचवू शकतो. कर वाचवण्यासाठी मुलांच्या नावावर गुंतवणूक करू शकता येते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, जीवन विमा आणि काही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने तुमचा कर तर वाचू शकतोच पण भविष्यात मोठा निधीही जमा होतो. PPF (Public Provident Fund) पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास करात सूट मिळते, तसेच त्यात गुंतवलेले पैसेही सुरक्षित असतात. पालक मुलाच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकतात. तुम्ही एका आर्थिक वर्षात PPF मध्ये 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. सध्या सरकार पीपीएफवर 7.1 टक्के व्याज देत आहे. पालक त्यांच्या अल्पवयीन मुलाचे पीपीएफ खाते देखील उघडू शकतात. मूल 18 वर्षांचे होईपर्यंत हे खाते पालकांच्या ताब्यात असते. यामध्ये लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की जर मुलाच्या पालकाचे आधीपासूनच पीपीएफ खाते असेल आणि त्याने मुलाच्या नावाने पीपीएफ खाते देखील उघडले असेल. अशावेळी त्या दोन्ही खात्यांमध्ये आर्थिक वर्षात केवळ 1.5 लाख रुपयेच गुंतवू शकतात. होम, ऑटो लोनसह इतर लोनही महाग; ‘या’ बँकांनी वाढवले व्याजदर, चेक करा नवे दर पालकांपैकी कोणीही मुलाच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकतो आणि कलम 80 अंतर्गत कर सूट मिळवू शकतो. खाते उघडण्यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो, वयाचा पुरावा आणि पालकांचे पॅन कार्ड आवश्यक आहे. मूल 18 वर्षांचे झाल्यावर पालकाचे नाव पीपीएफ खात्यातून काढून टाकले जाते. प्रौढ मुल स्वतः त्यात गुंतवणूक करू शकतो. Bank Time: आजपासून बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल, ग्राहकांना होईल फायदा सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojna) मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना (SSY) खाते उघडून, पालकाला प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत देखील मिळू शकते. सध्या सरकार सुकन्या समृद्धी योजनेत 7.6 टक्के दराने व्याज देत आहे. पालक त्यांचे मूल 10 वर्षांचे होण्यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडू शकतात. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर या खात्यातून रक्कम काढता येईल. खाते उघडल्यानंतर 21 वर्षांनी किंवा मुलीच्या लग्नानंतर हे खाते बंद केले जाऊ शकते.