मुंबई, 22 फेब्रुवारी : देशातल्या मुलींच्या (Girls) सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असतं. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी (Bright Future) सरकारनं अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. ‘सुकन्या समृद्धी योजना’ (Sukanya Samriddhi Yojana) ही अशाच कल्याणकारी योजनांपैकी एक आहे. यामुळे मुलींच्या भविष्यासाठी एक भक्कम आर्थिक पाठबळ तर तयार होतंच, याशिवाय पालकांसाठी बचतीचा एक सोपा आणि फायदेशीर पर्यायदेखील खुला होतो. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सध्या 7.6 टक्के व्याजदर मिळतो. पालकांनी गुंतवलेली रक्कम 9 वर्षं 4 महिन्यांच्या कालावधीत दुप्पट होते. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचं खातं उघडता येतं. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीसाठी दिवसाला 100 रुपये वाचवून 15 लाख रुपये आणि 416 रुपये वाचवून 65 लाख रुपये उभारू शकता, जे तिच्या चांगल्या भविष्यासाठी उपयोगात येऊ शकतात. काय आहे सुकन्या समृद्धी योजना? सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही केंद्र सरकारची मुलींसाठी असलेली विशेष बचत योजना आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत ही बचत योजना सुरू करण्यात आली आहे. विविध अल्पबचत योजनांपैकी सुकन्या समृद्धी ही सर्वोत्तम व्याजदर (Interest Rate) असलेली योजना आहे. IDBI बँकेतली आपली संपूर्ण हिस्सेदारी LIC विकणार नाही; काय आहे प्लानिंग? खातं कसं सुरू कराल? ज्या पालकांना दोन मुली आहेत, असे कोणतेही पालक आपल्या मुलींसाठी या योजनेअंतर्गत बचत खातं (Saving Account) उघडू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेचं खातं मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी सुरू करावं लागतं. फक्त 250 रुपयांच्या ठेवीसह पालक हे बचत खातं उघडू शकतात. ‘या’ ठिकाणी सुरू करता येईल खातं कोणतंही पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा व्यावसायिक बँकेच्या अधिकृत शाखेत सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडता येतं. वयाची 21 वर्षं पूर्ण झाल्यानंतर मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. Investment Tips : सीनियर सिटिजन्ससाठी या बँकांमध्ये खास सुविधा, सुरक्षेसह मिळेल अधिकचे व्याज किती गुंतवणूक करू शकता? सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. सध्या त्यावर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत 9 वर्षं 4 महिन्यांत रक्कम दुप्पट (Double) होते. जाणून घ्या कसे मिळतील 65 लाख रुपये? » तुम्ही या योजनेत दरमहा तीन हजार म्हणजेच वर्षाकाठी 36 हजार रुपये गुंतवले, तर तुम्हाला 14 वर्षांनंतर 7.6 टक्के दरासह वार्षिक चक्रवाढ व्याज (Compound Interest) पद्धतीनुसार नऊ लाख 11 हजार 574 रुपये मिळतील. » मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर म्हणजेच मॅच्युरिटीनंतर ही रक्कम सुमारे 15 लाख 22 हजार 221 रुपये इतकी होईल. म्हणजेच, तुम्ही दररोज 100 रुपये वाचवून ते जमा केले तर तुम्ही आपल्या मुलीसाठी 15 लाख रुपये उभे करू शकता. » तुम्ही दररोज 416 रुपयांची बचत केली तर 65 लाख रुपये जमा होऊ शकतात. कधीपर्यंत अकाउंट राहील सुरू? सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरू केलेलं खातं मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचं लग्न होईपर्यंत सुरू ठेवता येतं. वरील माहितीच्या आधारे तुम्ही आपल्या मुलींसाठी या योजनेत बचत खातं सुरू करू शकता. या योजनेत मिळणारा व्याजदर चांगला असल्यानं मुलगी मोठी होईपर्यंत पुरेसा निधी उभा राहू शकतो.