JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Loan Moratorium: तुम्हाला कसा आणि किती मिळणार या व्याजमाफीचा फायदा, सरकारनं दिलं उत्तर

Loan Moratorium: तुम्हाला कसा आणि किती मिळणार या व्याजमाफीचा फायदा, सरकारनं दिलं उत्तर

Interest Waiver on Loan Moratorium : लोन मोरेटोरियमबाबत अर्थ मंत्रालयाकडून, व्याजाबाबत दिलासा देणारं कॅल्युलेशन जारी करण्यात आलं आहे. कर्जदाता कर्जावरील Loan Moratorium च्या सहा महिन्यांच्या कालावधीत चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज (compound interest and simple interest) यांच्यातील फरकाइतकी रक्कम तुमच्या खात्यात क्रेडिट करणार आहे.

0107

भारतीय रिजर्व्ह बँकेने सर्व कर्जदाता संस्थानांना, दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी नुकतंच घोषित करण्यात आलेलं, व्याजावरील व्याज माफ करण्याची योजना लागू करण्याचं सांगितलं आहे. या योजनेंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजावर, लावलं जाणारं व्याज 1 मार्च 2020 ते पुढील सहा महिन्यांसाठी माफ केलं जाईल.

जाहिरात
0207

चक्रवाढ व्याज आणि साधं व्याज यांच्यातील फरकाइतकी रक्कम सरकार देणार आहे. ही रक्कम 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या लोन मोरेटोरियम कालावधीसाठी असेल.

जाहिरात
0307

आरबीआयने सर्व बँकांना 5 नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम क्रेडिट करण्यास सांगितलं आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर 6500 कोटी अतिरिक्त रुपयांचा भार पडणार आहे.

जाहिरात
0407

दोन कोटीहून अधिक कर्ज नसणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

जाहिरात
0507

या योजनेंतर्गत एमएसएमई (MSME) लोन, एज्युकेशन, हाउसिंग, कंज्युमर, ऑटो, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डवरील लोनचा समावेश आहे.

जाहिरात
0607

योजनेचा फायदा घेण्यासाठी 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत लोन अकाऊंट स्टँडर्ड असलं पाहिजे. म्हणजेच कर्जाचा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत भरला गेला पाहिजे, हे नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स (NPA) श्रेणीमध्ये नसले पाहिजे.

जाहिरात
0707

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही अर्ज करण्याची गरज भासणार नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या