वीजबिल येईल 3 हजार रुपयांनी कमी! ताबडतोब घरातून काढा ‘हे’ डिव्हाइस
मुंबई, 18 जुलै: अलीकडच्या काळात आपल्या घरामध्ये वीजेवर चालणारी अनेक उपकरणं असतात. काही वर्षांपूर्वी लोकांच्या घरात वीजेवर चालणारे बल्ब असायचे. परंतु सध्या वीजेवर चालणारी अनेक उपकरणं आपल्या घरात असतात. बल्बशिवाय टिव्ही, मिक्सर , वॉशिंग मशिन, हिटर, इलेक्ट्रीक शेगड्या इत्यादी अनेक उपकरणं आपण वापरतो. पंखे, एसी यांमुळं वीजबिलात वाढ होते. एसी आणि बर्याच इलेक्ट्रॉनिक उपकरणे दिवसभर चालतात. एसीचा वापर केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर पावसाळ्यातही केला जातो, कारण पावसात आर्द्रता वाढते. आज आम्ही आपल्याला काही अशाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून आपण वीज बिल (How To Save Electricity Bill?) कमी करू शकता. उन्हाळ्यात, वीज बिल हजारो रूपयांमध्ये येतं. परंतु काही टिप्सचे अनुसरण करून आपण वीजबिल प्रतिमहिना 3 हजार रुपयांपर्यंत कमी करू शकता. एसीमुळे येतं अधिक वीज बिल (The more electricity bills come from AC)- आपल्या घरातील वीजबिल जास्त येण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे एसी होय. दिवसभर एसी चालविल्यामुळे वीज बिल अधिक येतं. म्हणून, आपण प्रथम एसीकडे लक्ष दिलं पाहिजे. जर आपण सामान्य एसी वापरत असाल तर वीज बिल अधिक येऊ शकतं. आपण वीज बचत करण्यासाठी इन्व्हर्टर एसी स्थापित करू शकता. यामुळं वापर लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकतो. कंपन्यांचा असा दावा आहे की, अशा एसीमुळं वीज बिल 40 टक्क्यांनी कमी केले जाऊ शकते. हेही वाचा: Monsoon Tips: पावसाळ्यात घराबाहेर जाताना सोबत ठेवा ‘या’ चार गोष्टी, नाहीतर होतील वांदे जर आपले वीज बिल दरमहा 10 ते 12 हजार रुपये येत असेल, तर इन्व्हर्टर एसी स्थापित करून, तुमचं बिल 3 हजार रुपयांनी कमी होईल. यासाठी, आपल्याला त्वरित एसी बदलण्याची आवश्यकता आहे. कंपन्या पीसीबीची वॉरंटीदेखील देतात. तुम्हाला कमीतकमी 5 वर्षे पीसीबीचं टेन्शन राहणार नाही. स्वयंपाकघरातील चिमणी (Kitchen chimney) हे देखील मुख्य कारण - स्वयंपाकघरातील चिमणी देखील अधिक वीज घेते. यापासून वाचण्यासाठी आपल्याला वेंटिलेशनसाठी दुसरी जागा पाहावी लागेल. चिमणीचा सतत वापर केल्याने वीज बिल देखील वाढते. आपण चिमणीऐवजी दुसरे डिव्हाइस ठेवू शकता. यासाठी आपण इंजीनियरशी सल्लामसलत करू शकता