पेट्रोल पंपाचे मालक होण्याची सुवर्ण संधी इंधन कंपन्यांनी दिली आहे. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. पेट्रोल पंपाचे मालक होण्यासाठी नियम आणि अटी काय आहेत जाणून घ्या.
तुम्ही जर पेट्रोल पंप उघडायचा विचार करत असाल तर हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) या इंधन कंपन्यांनी तुमच्यासाठी सुवर्ण संधी आणली आहे. देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रिटेल आऊटलेट डिलरचे अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामुळे डिलरशीप घेऊन लाखो रुपये कमवण्याची संधी तुम्हाला मिळत आहे.
या राज्यांमध्ये उघडू शकता पेट्रोल पंप : हरियाणा, दिल्ली, अरुणाचल प्रदेश, आसाम, केरळ, मणिपूर, मेघालय, नागालॅण्ड, ओडिसा, पाँडिचेरी, पंजाब, सिक्किम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, दिव-दमण, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र
असं करा अर्ज : रिटेल आऊटलेट डिलर बनण्यासाठी www.petrolpumpdealerchayan.in या वेबसाईडवर अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर दिलेली रक्कम भरावी लागेल. ते पेमेंट ऑनलाईन करावं लागेल. ऑनलाईन अर्ज भरण्याची अतिंम तारीख 24 डिसेंबर असेल.
पेट्रोल पंपाचे मालिक होण्यासाठी सर्व प्रथम तुम्ही भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 21 ते 60 वयोगटातील व्यक्ती पेट्रोल पंपासाठी अर्ज करू शकते आणि त्या व्यक्तीचं शिक्षण किमान दहावी असायला हवं.
इंधन कंपन्यांच्या सोयीनुसार पेट्रोल पंपाची निर्मिती केली जाते. ज्या ठिकाणी पेट्रोल पंप उघडणार आहे त्याबद्दलची माहिती वृत्तपत्रांमध्ये दिली जाते. यामध्ये सर्व नियम आणि अटींचा उल्लेख केला जातो. नियम मान्य असल्यास तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यानंतर इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून निरीक्षणही केलं जातं आणि पेट्रोल पंप उघडण्याबाबत पेट्रोलिअम मंत्रालय आक्षेप घेऊ शकतं आणि वेळ पडल्यास बंदीसुद्धा आणू शकतं
पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुमच्याकडे जमीन असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय महामार्गावर किमान 1200 ते 1600 स्केवेअर मीटर आणि शहरी भागामध्ये 800 स्केवेअर मीटर जमीन असली पाहिजे. जमीन जर तुमच्या नावावर नसेल तर तुम्ही भाड्यानंही विकत घेऊ शकता. पण जमीनीचा भाडे करार कंपनीला दाखवणं मात्र बंधनकारक आहे. मालमत्तेच्या नकाशासोबत जमीनीचे सर्व कागदपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून तपासलं जातं.
सरकारने पेट्रोल पंप उघडण्याचे नियम अधिक सोपे केले आहेत. तुमच्याकडे योग्य रक्कम नसली तरीही तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. शहरी भागातील पेट्रोल पंपासाठी 25 लाख रुपये आणि ग्रामीण भागातील पेट्रोल पंपासाठी 12 लाखांचे डिपॉझिट बँकेत जमा करावं लागणार आहे.