JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI ग्राहक आता WhatsApp द्वारे चेक करू शकतात खात्यातील रक्कम, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

SBI ग्राहक आता WhatsApp द्वारे चेक करू शकतात खात्यातील रक्कम, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Check balance of SBI account through Whatsapp: स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) नवीन व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा सुरू केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या या नव्या सेवेद्वारे यूजर्स खात्यातील शिल्लक तपासू शकणार आहेत.

जाहिरात

SBI ग्राहक आता WhatsApp द्वारे चेक करू शकतात खात्यातील रक्कम, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई**, 31** जुलै : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नवीन WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. या सेवेची घोषणा बँकेनं नुकतीच एका ट्विटद्वारे केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या या नव्या सेवेद्वारे यूजर्स खात्यातील शिल्लक तपासू शकणार आहेत. यासाठी त्यांना कोणतेही स्वतंत्र अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार नाही किंवा कोणत्याही एटीएमला भेट द्यावी लागणार नाही. बँकेनं दिलेल्या या सुविधेचा ग्राहकांना लाभ होणार आहे आणि खात्यातील रक्कम जाणून घेणं त्यांना जास्त सुलभ होणार आहे. एसबीआयने ट्विट करून लिहिलं होतं की, तुमची बँक आता व्हॉट्सअ‍ॅपवर आली आहे. तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक आणि मिनी स्टेटमेंट कुठूनही पाहू शकता. सध्या, व्हॉट्सअ‍ॅपवर एसबीआय वापरकर्ते त्यांच्या खात्यातील शिल्लक आणि मिनी बँक स्टेटमेंट पाहू शकतात. SBI WhatsApp बँकिंग सेवांसाठी, वापरकर्त्यांना +919022690226 वर Hi पाठवावं लागेल. हे करण्याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून खात्यातील शिल्लक कशी जाणून घ्यायची? (How to check SBI account balance through whatsapp?)-

यापैकी एक पर्याय निवडणे आवश्यक आहे:

याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅप SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना सर्वोत्तम सेवा देखील देतं. या सेवेचं नाव SBI Card WhatsApp Connect असं आहे. या सेवेद्वारे, SBI क्रेडिट कार्ड ग्राहक खात्याचा सारांश, रिवॉर्ड पॉइंट आणि थकबाकीची रक्कम तपासू शकतात आणि कार्ड पेमेंट देखील करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या