मुंबई, 2 मे : अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2022) हा हिंदूंसाठी अतिशय शुभ सण म्हणून ओळखला जातो. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येणाऱ्या या सणात सोने खरेदीचे विशेष महत्त्व आहे. तुम्हीही अक्षय्य तृतीयेला सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold Jewelry) खरेदी करणार असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही बनावट सोने खरेदी करणे टाळू शकाल. येथे आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता मोजू शकता. झी बिझनेसने याबाबत माहिती दिली आहे. हॉलमार्किंगची नोंद सोन्याची शुद्धता (Pure Gold) ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हॉलमार्किंगची (Hallmark) नोंद घेणे. सोन्याचे दागिने खरेदी करताना नेहमी BIS ची ओळख शोधा. मात्र, सोन्याचे हे हॉलमार्किंग कितपत खरे आहे, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. मूळ हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी चिन्ह आहे आणि हॉलमार्किंग केंद्राच्या लोगोसह सोन्याची शुद्धता देखील लिहिलेली आहे. देशात टप्प्याटप्प्याने सोने हॉलमार्किंग अनिवार्य होणार; घरातील जुन्या हॉलमार्किंग नसलेल्या दागिन्यांचं काय होणार? BIS केअर अॅप सोन्याच्या गुणवत्तेची खात्री करणारे हॉलमार्किंग तपासण्यासाठी, BIS ने BIS केअर अॅप नावाचे अॅप जारी केले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही वस्तूचे हॉलमार्किंग किंवा ISI मार्क सहज तपासू शकता. एवढेच नाही तर मालाच्या दर्जाबाबत शंका असल्यास त्याबाबत तक्रारही करू शकता. हॉलमार्किंग तपासण्याव्यतिरिक्त, तुम्ही सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे सोन्याचे दागिने एका बादली पाण्यात बुडवावे लागतील. जर दागिना बुडाला तर समजावे की सोने खरे आहे, काही काळ तरंगत राहिले तर सोने खोटे आहे असे समजावे. खरे तर, सोने कितीही हलके असले तरी ते नेहमी पाण्यात बुडते. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणार की गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणार? काय सर्वोत्तम पर्याय व्हिनेगरचा वापर व्हिनेगर किंवा व्हिनेगरच्या माध्यमातूनही तुम्ही घरच्या घरी सोन्याची शुद्धता ओळखू शकता. सोन्याच्या दागिन्यांवर व्हिनेगरचे काही थेंब टाका. जर त्याच्या रंगात बदल होत नसेल तर सोने खरे आहे असे समजून घ्या. दागिन्यांचा रंग बदलला तर ते सोने बनावट आहे. अॅसिड टेस्ट व्हिनेगर टेस्ट व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या दागिन्यांची ऍसिड टेस्ट देखील करू शकता. यासाठी तुमच्या सोन्याच्या दागिन्यांना पिनने हलके स्क्रॅच करा. नंतर त्यावर नायट्रिक ऍसिडचे काही थेंब टाका. खऱ्या सोन्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, पण खोटे सोने लगेच हिरवे होईल. मॅग्नेट टेस्ट तुमच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये काही भेसळ आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही चुंबक चाचणी देखील करू शकता. सोने चुंबकाला चिकटत नाही. म्हणून एक मजबूत चुंबक घ्या आणि सोन्याकडे घ्या. तुमच्या दागिन्यांमध्ये काही हालचाल आढळल्यास त्यात काही भेसळ असू शकते.