Process to Add bank account to Whatsapp: आपण पैसे पाठवण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटीएम सारखी युपीआय अकाउंट वापरतो. परंतु आपण व्हॉट्स अॅपच्या माध्यमातूनही पेमेंट पाठवू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यासाठी व्हॉट्सअप अकाउंटला बँक अकाउंट कसं जोडायचं हे पाहणार आहोत.
आज आपण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यासाठी व्हॉट्सअप अकाउंटला बँक अकाउंट कसं जोडायचं हे पाहणार आहोत.
यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप अॅप उघडावं लागेल. यानंतर थ्री डॉट मेन्यू पर्याय निवडा
यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्या स्क्रीनवर अॅड पेमेंट मेथड हा पर्याय दिसेल.
पुढे चालू ठेवण्यासाठी कंटीन्यू बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचं बँक अकाउंट अॅड करून तुम्ही कुणालाही पैसे पाठवू शकता.