मुंबई, 26 सप्टेंबर : मोफत मिळणाऱ्या गोष्टी कोणाला नाही आवडणार? तुम्हाला कार चालवण्यासाठी मोफत पेट्रोल-डिझेल दिलं तर जास्त आनंद होईल. HDFC बँकेनं इंडियन ऑइल काॅर्पोरेशन लिमिटेड (IOCL)सोबत एक नवे क्रेडिट कार्ड लाँच केलंय. या कार्डाच्या अनेक खासीयती आहेत. HDFC बँक आणि इंडियन ऑइल काॅर्पोरेशन लिमिटेड (IOCL)नं नाॅन मेट्रो शहरं आणि गावांसाठी हे कार्ड लाँच केलंय. याचं नाव ‘इंडियन ऑइल HDFC बँक क्रेडिट कार्ड’. या कार्डामुळे ग्राहकांना पेट्रोल-डिझेल खरेदीवर बरीच सूट मिळू शकते. या कार्डाची किंमत 500 रुपये आहे हे कार्ड रुपे आणि विझा या दोन्ही प्लॅटफाॅर्मवर उपलब्ध आहे. या क्रेडिट कार्डाची वर्षाला फी आहे 500 रुपये. तुम्ही वर्षाला 50 हजार रुपये कार्डावरून खर्च केलेत तर वर्षभराची फी माफ होईल. बँकेतले पैसे सुरक्षित ठेवायचेत? मग SBI चा हा सल्ला मानाच
हे आहेत या कार्डाचे फीचर्स इंडियन ऑइल HDFC बँक क्रेडिट कार्डाद्वारे 27000 हून जास्त IOCL आउटलेट्सवर फ्युएल पाॅइंट्स नावाचा रिवाॅर्ड पाॅइंट मिळवू शकतात. याशिवाय इतर खर्चांमध्ये वाणसामान, बिल पेमेंट, युटिलिटी, शाॅपिंग इत्यादींवर फ्युएल पाॅइंट कमवू शकतात. या पाॅइंट्सना वर्षाला 50 लीटरपर्यंत फ्युएलसाठी कमी केलं जाईल. म्हणजे तुम्ही वर्षाला 50 लीटरपर्यंत पेट्रोल या पाॅइंट्सद्वारे मोफत घेऊ शकता. मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय, ‘हे’ आहेत टाॅप 5 उद्योगपती कार्डासाठी असा करा अर्ज इंडियन ऑइल HDFC बँक क्रेडिट कार्डासाठी www.hdfcbank.com वर जाऊन क्लिक करा किंवा जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करा. छोट्या शहरांमध्ये क्रेडिट कार्डाचा वापर व्हावा, म्हणून ही योजना आखली गेलीय. तसंच कॅशलेस ट्रॅन्झॅक्शनला प्रोत्साहन मिळावं म्हणून बँकेनं हे पाऊल उचललंय. VIDEO : पुण्याच्या पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया