JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gruha Lakshmi scheme : 2 हजार रुपयांसाठी सासू-सूनेचं भांडण, सरकार नक्की कोणाला देणार पैसे?

Gruha Lakshmi scheme : 2 हजार रुपयांसाठी सासू-सूनेचं भांडण, सरकार नक्की कोणाला देणार पैसे?

सरकारने गृहलक्ष्मी नावाच्या योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत घरातील मुख्य महिलेला 2000 रुपये मिळणार असं जाहीर देखील करण्यात आलं.

जाहिरात

गृह लक्ष्मी योजना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Gruha Lakshmi scheme : सरकारच्या योजना ह्या गरजू आणि आवश्यक असलेल्या लोकांना योग्य ती मदत मिळावी म्हणून असतात. लोकांना आर्थिक मदत मिळावी आणि गरजू लोकांना पैसे कमवण्याचं एक साधन निर्माण व्हावं म्हणून ह्या योजना वेगवेगळ्या पातळीवर ह्या योजना राबवल्या जातात. मात्र सरकार करायला गेलं एक आणि झालं भलतंच अशी अवस्था झाली आहे. सरकारने गृहलक्ष्मी नावाच्या योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत घरातील मुख्य महिलेला 2000 रुपये मिळणार असं जाहीर देखील करण्यात आलं. ह्या योजनेची घोषणा होताच प्रत्येक घरातल्या महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पैसे आपल्यालाच मिळणार कारण घरातील सूत्र सगळी आपल्याच हातात आहेत असं महिलांना वाटू लागलं आणि घराघरात गृहकलह निर्माण होऊ लागले.

77 लाखांचा खर्च, 25 टन लोखंड; भर चौकात का उभारलं हे जहाज?

बघता बघता सासू-सूनांमधील वाद वाढत गेले आणि अखेर हे सगळं सरकारपर्यंत पोहोचलं. कुटुंबातील सदस्य सासू-सूनांच्या भांडणाला वैतागले, पण करणार काय अशी परिस्थिती निर्माण झाली. सासू घरातील मुख्य असल्याने तिला पैसे मिळणार असं वाटत होतं, तर गृहलक्ष्मी म्हणून सूनेचा मान म्हणून सूनही भांडत होती.

Brand Facts : खळखळून हसायला लावणारे ‘Zoo Zoo’ सध्या काय करतात?

संबंधित बातम्या

शेवटी कर्नाटक सरकारमधील महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्‍मी हब्‍बलकर यांना या घोषणेनंतर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. त्यांनी सासू आणि सूनांमधील संभ्रम दूर केला. गृह लक्ष्मी योजनेंतर्गत सासूलाच हे 2000 रुपये मिळणार आहेत. सासू ही घराची मुखीया असते असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने कुटुंबप्रमुखाला 2000 रुपयांची रोख आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, याबाबत स्पष्ट सूचना न मिळाल्याने सासू-सुनेमध्ये पैशांवरून वाद सुरू झाले होते. आता मात्र हब्‍बलकर यांनी ह्या योजनेचा लाभ कुणाला मिळणार हे सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या