JOIN US
मराठी बातम्या / मनी / Real Estate क्षेत्रात गुंतवणुकीची चांगली संधी; घरांच्या किमती लवकरच वाढण्याची शक्यता

Real Estate क्षेत्रात गुंतवणुकीची चांगली संधी; घरांच्या किमती लवकरच वाढण्याची शक्यता

सरकारशिवाय आरबीआयनेही गेल्या दोन वर्षांपासून कर्ज स्वस्त केले आहे. सध्या व्याजदर 7 टक्क्यांपेक्षा कमी आहे. याशिवाय RERA आणि GST सारख्या उपाययोजनांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रालाही चालना मिळाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 एप्रिल : आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकालाचा वाटतं. त्यामुळे लोकांच्या गराजांनुसार रिअर इस्टेट क्षेत्र वाढत आहे. 2030 पर्यंत देशाचा गृहनिर्माण उद्योग एक लाख कोटी डॉलर म्हणजेच 76 लाख कोटी रुपयांचा होईल, असे सांगण्यात येत आहे. अहवालात असे म्हटले आहे की 2025 पर्यंत देशाच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा 13 टक्क्यांहून अधिक असेल. 2050 पर्यंत देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने घरांची मागणीही वाढणार आहे. यामुळे केवळ विक्रीच वाढणार नाही तर या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधीही वाढतील. यासोबतच येत्या काही काळात घरांच्या किमतीही वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रिअल इस्टेट उद्योगाला महामारीतून सावरण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नांमध्ये टाऊनशिप आणि विकास प्रकल्पांमध्ये एफडीआयची मान्यता, मुद्रांक शुल्कात कपात यांचा समावेश आहे. या क्षेत्राला प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या प्रकल्पांचीही मदत मिळत आहे. स्वस्त कर्ज उपलब्ध सरकारशिवाय आरबीआयनेही गेल्या दोन वर्षांपासून कर्ज स्वस्त केले आहे. सध्या व्याजदर 7 टक्क्यांपेक्षा कमी आहे. याशिवाय RERA आणि GST सारख्या उपाययोजनांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रालाही चालना मिळाली आहे. 47 टक्के लोकांना गुंतवणूक करायची आहे रिअल इस्टेट संस्था नरेडकोचे (National Real Estate Development Council) म्हणणे आहे की सुमारे 47 टक्के लोकांना सोने, शेअर बाजार आणि एफडीऐवजी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे. 2020 च्या उत्तरार्धात, 33 टक्के लोकांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची होती. नरेडको म्हणते की, साथीच्या रोगामुळे लोकांना मोठी आणि चांगली घरे हवी आहेत. 6 महिन्यांत किंमत वाढेल NAREDCO च्या सर्वेक्षणात 52 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की पुढील 6 महिन्यांत घरांच्या किमती वाढतील. 73 टक्के लोक घरांसाठी सवलत आणखी वाढवण्याची अपेक्षा करत आहेत. NSE गृहनिर्माण निर्देशांक नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने नुकताच निफ्टी हाऊसिंग इंडेक्स लाँच केला आहे. या बेंचमार्कच्या बरोबरीने, ICICI प्रुडेंशियलने नवीन गृहनिर्माण फंड सादर केला आहे. ते रिअल इस्टेट कंपन्या आणि इतर संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करेल. त्याचा फायदा गृहनिर्माण क्षेत्राच्या जलद गतीने होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या