फिक्स्ड डिपॉझिट
मुंबई : सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून FD कडे पाहिलं जातं. ज्या लोकांना सुरक्षित गुंतवणूक निवडायची आहे ते FD कडे जातात. FD वर व्याजदर चांगले व्याजदर मिळावेत म्हणून ग्राहक जास्त प्रयत्नशील असतात. नुकतंच काही बँका FD वर 9 टक्के व्याजदर देत आहेत असं जाहीर केलं. त्यामुळे तुम्ही जर पैसे गुंतवले नसतील तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या बँकेत तुमचं खात असेल तर तुम्ही FD 9 टक्के व्याजाने ठेवून शकता. को ऑपरेटिव्ह बँक असेल तर टेन्शन घेऊ नका. 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा विमा उतरवलेला असतो. त्यामुळे बँक जरी बुडाली किंवा चोरी झाली तर अशा कंडिशनला तुम्हाला 5 लाखांपर्यंतची रक्कम परत मिळू शकते. युनिटी स्मॉल फायनान्स बँक (SFB) ग्राहकांसाठी 9 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.50 टक्क्यांपर्यंत FD व्याजदर ऑफर करते. बँक 1001 दिवसांच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 9.50% व्याज दर देते. सुधारित व्याजदर 14 जून 2023 पासून लागू आहेत.
HDFC बँकेने लॉन्च केले दोन नवे FD प्लान, गुंतवणुकीवर मिळेल जोरदार व्याजजनता स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी 366 दिवसांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या मुदत ठेवींवर 9 टक्क्यांपर्यंत व्याजदर देते. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने ठेव दर 9.11 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत.
Special FD: एचडीएफसी, एसबीआय की आयसीआयसीआय बँक? ज्येष्ठ नागरिकांना FD वर कुठे मिळतंय जास्त व्याज?ही बँक सर्वसामान्यांना 3 टक्के ते 8.51 टक्क्यांपर्यंत FD व्याजदर देते. 1000 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 9.11 टक्के व्याजदर दिला जातो. नवीन दर 25 मे 2023 पासून लागू होणार आहेत. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 444 दिवस आणि 888 दिवसांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी 9% आणि सामान्य नागरिकांसाठी 8.50% व्याज दर देते. हे दर 5 जून 2023 पासून लागू आहेत.