JOIN US
मराठी बातम्या / मनी / खुशखबर! सोन्याच्या दरात 2000 रुपयांची विक्रमी घसरण, असे आहेत आजचे दर

खुशखबर! सोन्याच्या दरात 2000 रुपयांची विक्रमी घसरण, असे आहेत आजचे दर

कोरोनाचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.यामुळे सोन्याच्या किंमतीत विक्रमी घसरण झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 मार्च : कोरोनाचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत पडल्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील 10 दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 5 हजारांची घसरण झाली आहे. मात्र आता सोन्यात तब्बल 2 हजारांची विक्रमी घसरण झाली आहे. 10 ग्रॅमसाठी सोन्याचे दर सध्या 39 हजार 661 आहेत. तर, चांदीचे दर प्रति किलो 6445 रुपयांनी घसरले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी, शेअर बाजाराच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांसाठी सोने - चांदी संकटमोचक झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीची विक्री करण्यास सुरवात केली. मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्याचा भाव 2022 रुपयांनी घसरला देशाच्या सराफा बाजारात 999 शुद्ध सोन्याचे भाव मागील आठवड्यात प्रति 10 ग्रॅम 42,017 रुपयांवरून 2,022 रुपयांनी घसरले आणि प्रति 10 ग्रॅम39 हजार 661 रुपये झाले. त्याचबरोबर चांदीचा दर शुक्रवारी, 43 हजार 085 रुपयांवरून घसरून 36 हजार 640वर आले होते. सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम कशामुळे? HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य 36 पैशांनी कमी झालं आहे. रुपयाची किंमत कमी झाल्यामुळे त्याचा फायदा सोन्याला झाला आहे. तर मोतीलाल ओसवाल फायनांशिअल सर्व्हिसेज के व्हाइस प्रेसिडेंट (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी यांनी सांगितलं की, गेल्या आठवड्यात जबरदस्त घसरण झाल्यानंतर आता सोन्याच्या किंमतीमध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रील बाजारात घसरण झाल्यामुळे हा परिणाम झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या