JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / पुढील 2 महिन्यांत महागणार सोनं; पटापट तपासा लेटेस्ट GOLD PRICE

पुढील 2 महिन्यांत महागणार सोनं; पटापट तपासा लेटेस्ट GOLD PRICE

Gold price Today : सोन्याचे सध्याचे दर काय आहेत आणि पुढील दोन महिन्यांत सोनं किती महागणार आहे पाहा.

0106

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. आतापर्यंत सोनं जवळपास 11500 रुपयांनी स्वस्त झालं आहे. पण सोन्याचे हे घटते दर फार काळ राहणार नाही. सोन्याचे दर पुन्हा वाढणार आहे, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

जाहिरात
0206

सध्या प्रति ग्रॅम सोनं 44,400 रुपये ते 45,200 रुपयांदरम्यान आहे. पण लवकरच MCX  वर सोनं 46,000  वर पोहोचेल. तर   तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या भावात अचानक वाढ होईल, सोन्याची किंमत  45,500 रुपयांच्या पार जाईल ते 48,000 पर्यंत पोहोचेल.

जाहिरात
0306

पुढील 2 महिन्यांत सोन्याचे दर प्रति तोळा 48,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असं IIFL सिक्योरिटीजचे वाइस प्रेसिडेंट (कमोडिटी अँड करेंसी) अनुज गुप्ता  यांनी सांगितलं. दोन महिन्यांत चांदीसुद्धा प्रति किलो 70,000 ते 72,000 रुपयांदरम्यान असेल.

जाहिरात
0406

शनिवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 44,000 रुपयांपेक्षा खाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 22 कॅरेट सोनं 160 रुपयांनी घसरून 43,760 रुपये झालं आहे.

जाहिरात
0506

गुड रिटर्न वेबसाइट्सच्या मते, 22 कॅरेटची प्रति तोळा किंमत दिल्ली 43,850 रुपये, चेन्नईत 42,160 रुपये आणि मुंबईत 43,760 रुपये आहे. केरळमध्ये 41,700, लखनऊत 43,850, पाटण्यात 43,760 आहे.

जाहिरात
0606

24 कॅरेट सोन्याची किंमत 44,920 रुपये प्रति तोळावरून 44,760 रुपयांवर आली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत केरळ, लखनऊ, पाटण्यात अनुक्रमे 45,490,  47,840, 44,760 रुपये प्रति तोळा आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या