JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / सोनं खरेदीची हीच आहे सुवर्णसंधी! एका क्लिकवर पाहा आजची Gold Price

सोनं खरेदीची हीच आहे सुवर्णसंधी! एका क्लिकवर पाहा आजची Gold Price

सोनं (latest gold price) जवळपास 11 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.

0106

गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचा दरात (Gold Price Today) लक्षणीय घसरण झाली आहे. 50 हजारांच्या वर असलेलं सोनं 50 हजारांच्या खाली आलं आणि अजूनही ही किंमत 50 हजारच्या खालीच आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे.ऑगस्टपासून आतापर्यंत सोनं जवळपास 11 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.

जाहिरात
0206

सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोनं 241 रुपयांनी वाढलं होतं. त्यामुळे सोन्याचा दर प्रति ग्रॅम 45,520 रुपये होता. जो आज मंगळवारी घसरला आहे. 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम 49310 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोनं प्रतिग्रॅम  45210 रुपये आहे. चांदीदेखील सोमवारी प्रति किलो  781 रुपयांनी वाढून 68,877  रुपयांवर पोहोचली होती. आज मंगळवारी हा दर 66300 रुपये आहे.

जाहिरात
0306

आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सजेंचमध्ये सोन्याचे दर थोड्या प्रमाणात वाढले आहे. सोनं जवळपास 35 रुपयांनी वाढलं आहे. ज्यामुळे एप्रिलच्या फ्युचर ट्रेंडमध्ये एक तोळा सोन्याचा दर 46,276.00 रुपये आहे. तर मार्चच्या फ्युचर ट्रेंडमध्ये चांदीच्या (Silver Price Today) किमतीत 304.00 रुपयांची घसरण झाली, ज्यामुळे ती 68,972.00 वर ट्रेंड होती.

जाहिरात
0406

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर वाढत आहेत. अमेरिकेन बाजारात सोनं 1.58 डॉलरनं वाढून 1,773.05 डॉलर प्रति औंस दरावर बंद झालं तर चांदीत घसरण झालेली पाहायला मिळाली. चांदी 0.16 डॉलरनं घसरून 27.40 डॉलर रेटवर बंद झाली.

जाहिरात
0506

सोनं गेल्या काही दिवसांपासून घसरत असलं तरी 2021 सालात सोन्याचे दर वाढणार हे पक्कं आहे, असं तज्ज्ञ म्हणाले आहेत. एकदा का सोन्याच्या किमती वाढू लागल्या तर सोनं प्रति तोळा 62,000 वर पोहोचेल.

जाहिरात
0606

दरम्यान सरकारकडून स्वस्त सोनं उपलब्ध करून दिलं जातं आहे. सरकारमार्फत सॉवरेन गोल्ड स्कीम (Sovereign Gold Bond) खुलं करण्यात आलं आहे. या स्किमअंतर्गत तुम्ही 1 मार्च से 5 मार्च पर्यंत गुंतवणूक करू शकता. गोल्ड बाँडसाठी 4,662 रुपये प्रति ग्रॅम म्हणजे 46,620 रुपये प्रति 10 ग्रॅम निश्चित करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला डिस्काऊंटही मिळेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या