मुंबई : बदलत्या काळासोबत महागाईदेखील वाढत आहे. सध्या दुप्पट-तिप्पट दराने वाढत असलेली महागाई सर्वांसाठीच मोठी डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे काही जीवनावश्यक वस्तूंसह सर्व वस्तूंच्या किमती झपाट्यानं वाढताना दिसत आहेत. यामध्ये सोन्याच्या दरांचाही समावेश आहे. सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 60 हजार रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे लग्नकार्यासाठी सोनं खरेदी करताना ग्राहकांना मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे. सोशल मीडियावर 64 वर्षांपूर्वीच्या सोन्याचं बिल व्हायरल झालं आहे. त्यावरचे 10 ग्रॅम सोन्याचे दर बघून नेटकऱ्यांना त्यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं सोनेखरेदीचं बिल 1959 या वर्षातलं आहे. त्यावरची 10 ग्रॅम सोन्याची किंमत सध्याच्या एक लिटर पेट्रोलच्या किमतीपेक्षा कमी दिसत आहे. व्हायरल फोटोमधलं बिल वामन निंबाजी अष्टेकर नावाच्या सराफा दुकानातलं आहे. हे दुकान पुण्यातल्या रविवार पेठेत असल्याचा उल्लेख या बिलावर आहे. शिवलिंग आत्माराम नावाच्या व्यक्तीने सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केल्याचं हे बिल आहे. या व्यक्तीने एकूण 909 रुपयाचे दागिने खरेदी केले होते.
सोन्याच्या दागिन्यांवर मिळू शकतं 1 कोटी रुपये कर्ज, असं करा अप्लायत्या बिलानुसार त्या वेळी 10 ग्रॅम सोन्याची किंमत केवळ 113 रुपये होती. 64 वर्षांपूर्वी एक किलो सोनं केवळ 11 हजार 300 रुपयांना मिळत होतं. सध्या शुद्ध सोन्याचा 55 ते 60 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. सध्या एक किलो डाळ व मोहरीच्या तेलाची किंमतदेखील 100 रुपयांपेक्षा जास्त आहे. यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता, की महागाई किती वाढली आहे.
युझर्सनी केल्या कमेंट्स पूर्वीच्या बुलेटच्या जुन्या बिलासोबतच गव्हाच्या किमतीचीही जुनी बिलं सोशल मीडियावर दिसू लागली आहेत. सध्या व्हायरल होत असलेलं सोन्याचं 64 वर्षांपूर्वीच बिल पाहून तर सर्वांना धक्काच बसला आहे. अनेक युझर्स ‘पूर्वीचे दिवस सर्वोत्तम होते’ असं म्हणत आहेत. काही युझर्सच्या मते, 64 वर्षांपूर्वी 50 हजार रुपयांची किंमत आजच्या काळातल्या 100 रुपयांइतकी असावी.
Gold-Silver Rate Today in Pune : गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ, पाहा पुण्यातील आजचे सोन्याचे दरसध्या सोन्याला गुंतवणुकीच्या दृष्टीने फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. कितीही दर वाढले तरी ग्राहकांचा सोने खरेदीकडे असलेला कल कमी झालेला नाही.