JOIN US
मराठी बातम्या / मनी / देशात टप्प्याटप्प्याने सोने हॉलमार्किंग अनिवार्य होणार; घरातील जुन्या हॉलमार्किंग नसलेल्या दागिन्यांचं काय होणार?

देशात टप्प्याटप्प्याने सोने हॉलमार्किंग अनिवार्य होणार; घरातील जुन्या हॉलमार्किंग नसलेल्या दागिन्यांचं काय होणार?

ज्वेलर्स यापुढे हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने ग्राहकाला विकू शकत नाहीत, परंतु ग्राहक अजूनही त्याचे जुने दागिने हॉलमार्कशिवाय ज्वेलर्सला त्याच पद्धतीने विकू शकतात जसे पूर्वी विकायचे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मे : देशातील सोन्याचे दागिने आणि वस्तूंच्या अनिवार्य हॉलमार्किंगचा (Gold hallmarking ) दुसरा टप्पा यावर्षी 1 जूनपासून सुरू होणार आहे. सोन्याचे हॉलमार्किंग 16 जून 2021 पर्यंत ऐच्छिक होते, त्यानंतर सरकारने (Central Government) टप्प्याटप्प्याने सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य लागू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात देशातील 256 जिल्हे त्याच्या कक्षेत आणण्यात आले. ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे म्हणणे आहे की अनिवार्य हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात, तीन अतिरिक्त कॅरेट (20, 23 आणि 24 कॅरेट) सोन्याचे दागिने 32 नवीन जिल्ह्यांच्या कक्षेत येतील, जेथे पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर, हॉलमार्क सेंटर (AHC) स्थापन केले आहे. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सोन्याच्या हॉलमार्किंगबाबत आजही अनेक ग्राहकांच्या मनात एक प्रश्न आहे की, सामान्य माणसाच्या घरात जुने विना हॉलमार्किंग सोन्याचे दागिने असतील, तर त्याचे काय होणार? त्यासाठीही हॉलमार्किंग आवश्यक आहे का? नियम काय म्हणतात ते जाणून घेऊया… हॉलमार्किंगचा नियम फक्त ज्वेलर्ससाठी सोन्याचे हॉलमार्किंग बंधनकारक असतानाही, ज्वेलर्स ग्राहकांकडून हॉलमार्किंगशिवाय जुने सोन्याचे दागिने परत खरेदी करू शकतात. म्हणजेच हॉलमार्कशिवाय जुने दागिने विकताना ग्राहकाला कोणतीही अडचण येणार नाही. ज्वेलर्सची इच्छा असल्यास, तो ग्राहकाकडून खरेदी केलेल्या सोन्याचे दागिने जसेच्या तसे हॉलमार्क करू शकतो, अन्यथा तो वितळल्यानंतर नवीन दागिने हॉलमार्क करू शकतो. तुमचं जन धन खातं आधार कार्डशी लिंक करा आणि मिळवा 1.3 लाखांचा फायदा, चेक करा प्रोसेस ग्राहकांना कोणतीही अडचण नाही ज्वेलर्स यापुढे हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने ग्राहकाला विकू शकत नाहीत, परंतु ग्राहक अजूनही त्याचे जुने दागिने हॉलमार्कशिवाय ज्वेलर्सला त्याच पद्धतीने विकू शकतात जसे पूर्वी विकायचे. म्हणजेच घरामध्ये ठेवलेले त्याचे हॉलमार्क नसलेले दागिने हॉलमार्क करून घेण्याचे टेन्शन त्याला घ्यायचे नाही. जुने सोन्याचे दागिने हा ज्वेलरसाठी एक प्रकारचा कच्चा माल आहे. ग्राहक त्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क लावू शकत नाही. ग्राहक त्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क का करू शकत नाही? सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगसाठी एक करार चिन्ह आहे, जे फक्त ज्वेलर्ससाठी आहे. या करारामध्ये अटी व शर्ती समाविष्ट केल्या आहेत. यानंतर, ज्वेलर्सला हॉलमार्किंगसाठी परवाना दिला जातो, त्यानंतरच त्यांना बीआयएस केंद्रांमधून हॉलमार्क केलेले सोन्याचे दागिने मिळू शकतात. हा परवाना ग्राहकाला दिला जात नाही, त्यामुळे ग्राहक स्वत: त्याचे जुने दागिने BIS केंद्रांवर नेऊ शकत नाही आणि हॉलमार्किंग करून घेऊ शकत नाही. तरीही ग्राहकाला त्याचे जुने दागिने हॉलमार्क करायचे असतील तर त्याला BIS नोंदणीकृत ज्वेलर्सशी संपर्क साधावा लागेल. यासाठी ज्वेलर्स ग्राहकाकडून प्रति सोन्याच्या दागिन्यासाठी 35 रुपये आकारतील. Loan Guarantor: एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होण्याआधी ‘या’ गोष्टी समजून घ्या ग्राहक दागिन्यांची शुद्धता तपासू शकतात जर ग्राहकाला त्याच्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासणी करून घ्यायची असेल तर ते तसे करू शकतात. देशात सध्या असलेल्या BIS हॉलमार्किंग केंद्रांना भेट देऊन कोणीही त्यांच्या जुन्या दागिन्यांची शुद्धता तपासू शकतो. सोन्याच्या दागिन्यांच्या चाचणीच्या बाबतीत, 4 वस्तूंपर्यंतच्या चाचणीचे शुल्क 200 रुपये आहे. 5 किंवा त्याहून अधिक सोन्याच्या वस्तूंच्या शुद्धतेची चाचणी करण्यासाठी, प्रत्येक वस्तूसाठी 45 रुपये शुल्क आकारले जाईल. शुद्धता तपासल्यानंतर, ग्राहकाला समजेल की त्याला यापूर्वी विकलेले दागिने किती कॅरेट सोन्याचे आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या