JOIN US
मराठी बातम्या / मनी / 30 लाखांची जमीन होती, आज 5 लाख कोटींची झाली, हे कुटुंब मुंबईचे खरे जमीनदार!

30 लाखांची जमीन होती, आज 5 लाख कोटींची झाली, हे कुटुंब मुंबईचे खरे जमीनदार!

स्वप्ननगरी मुंबईत जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर छप्पर असेल तर तो स्वतःला खूप भाग्यवान समजतो. अशा परिस्थितीत एखाद्या कुटुंबाकडे 3400 एकर जमीन असेल तर त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही त्या कुटुंबाच्या संपत्तीचा अंदाज लावू शकता का?

जाहिरात

हे कुटुंब मुंबईचे खरे जमीनदार!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी : दिल्ली-मुंबईसारख्या शहरात, जिथे एक मध्यमवर्गीय कुटुंब आपल्या आयुष्याची कमाई 1000 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट खरेदी करण्यात गुंतवते, तिथे मायानगरी मुंबईत एक-दोन नव्हे तर 3400 एकर जमीन असलेले कुटुंब आहे. यावरून तुम्ही या कुटुंबाच्या संपत्तीचा अंदाज लावू शकता. हे पारशी कुटुंब आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की, देशातील कोणत्याही समाजात श्रीमंती असेल तर ती पारशी समाजाची आहे. देशातील सुमारे 55 हजार लोकसंख्या असलेल्या या समाजाकडे लाखो कोटींची संपत्ती आहे. यामध्ये गोदरेज कुटुंब हे एक आहे. गोदरेज कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय कुलूप बनवण्याचा होता. आज या कुटुंबाच्या चार मोठ्या कंपन्या आहेत. यामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज अॅग्रोव्हेट आणि गोदरेज प्रॉपर्टीज यांचा समावेश आहे. या कुटुंबात प्रामुख्याने तीन भागधारक आहेत. यामध्ये गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदि गोदरेज, त्यांचा भाऊ नादिर गोदरेज आणि त्यांचा पुतण्या जमशेद गोदरेज यांचा समावेश आहे. या समूहातील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 11.5 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 95 हजार कोटी रुपये आहे. हा देशातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक समूहांपैकी एक आहे. वाचा - Elon Musk पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; अदानींचा नंबर कितवा? ब्रिटिश सरकारकडून खरेदी केलेली जमीन गोदरेज इंडस्ट्रीजचे चेअरमन आदि गोदरेज यांचे आजोबा पिरोजशा गोदरेज यांनी ही जमीन खरेदी केली होती. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिश सरकारकडून 3000 एकर जमीन अवघ्या 30 लाख रुपयांना विकत घेतली. त्यानंतर आणखी 400 एकर जमीन खरेदी करण्यात आली. सध्या यापैकी सुमारे 1000 एकर जमीन विकसित होऊ शकते. त्याची अंदाजे किंमत सुमारे 5 लाख कोटी रुपये आहे. ही रक्कम या समूहाच्या चारही कंपन्यांच्या बाजार भांडवलाच्या चौपट आहे. तसे पाहता या 3400 एकरांपैकी 1800 एकरात खारफुटी आहे. म्हणजेच मुंबईचे पर्यावरण लक्षात घेऊन यांमध्ये कोणतेही बांधकाम करता येणार नाही. त्यात जंगले आहेत.

केवळ तीन एकर जमीन 2200 कोटींहून अधिक किंमतीला विकली बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, 2019 मध्ये गोदरेज समूहाने काही जमिनीचा सौदा केला होता. त्यात तीन एकरचा भूखंड एका जपानी कंपनीने 2200 कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतला. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की गोदरेज समूहाने आपल्या सर्व कंपन्या आणि कार्यालये बांधूनही अद्याप विकसित करण्याजोगी 1000 एकर जमीन आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या