JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुमच्या गॅस सिलेंडरवर इन्शुरन्स कव्हर उपलब्ध; एखाद्या दुर्घटनेनंतर मिळेल नुकसान भरपाई

तुमच्या गॅस सिलेंडरवर इन्शुरन्स कव्हर उपलब्ध; एखाद्या दुर्घटनेनंतर मिळेल नुकसान भरपाई

अधिकृत ग्राहकाच्या नोंदणीकृत पत्त्यावर कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास 2 लाखांपर्यंतचा विमा दावा उपलब्ध आहे. मालमत्तेला झालेल्या नुकसानीच्या बदल्यात हा क्लेम मिळतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 मे : एखादा ग्राहक नवीन गॅस कनेक्शन घेतो तेव्हा गॅस कंपनीकडून ग्राहकाला विमा संरक्षण दिले जाते. परंतु, बहुतेक ग्राहकांना या विमा पॉलिसीबद्दल माहिती नाही. गॅस कनेक्शन खरेदी करण्यासोबतच, ग्राहकांना कंपनीकडून विमा पॉलिसीची सुविधा दिली जाते, ज्याचा प्रीमियम ग्राहकाला भरावा लागत नाही. भारत गॅस (Bharat Gas), इंडेन गॅस (Indane Gas) आणि एचपी गॅस (HP Gas) या तिन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा देतात. गॅस सिलेंडरमुळे कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास ग्राहक नंतर इन्शुरन्स क्लेम करू शकतात. एबीपी न्युजने याबाबतची माहिती दिली आहे. गॅस कनेक्शनवर किती कव्हर मिळतो गॅस कंपनी इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडरमुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास गॅस सिलेंडरच्या ग्राहकांना आणि थर्ड पार्टी विमा संरक्षण दिले जाते. गॅस कंपनीच्या नोंदणीकृत पत्त्यावर गॅसमुळे झालेल्या कोणत्याही अपघातासाठी कंपनी विमा संरक्षण देते. आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? चेक करा प्रोसेस गॅस सिलेंडर अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास 6 लाख रुपयांपर्यंतचा विमा क्लेम मिळतो. दुसरीकडे, दुखापत झाल्यास, तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम मिळू शकतो. यासोबतच अधिकृत ग्राहकाच्या नोंदणीकृत पत्त्यावर कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास 2 लाखांपर्यंतचा विमा दावा उपलब्ध आहे. मालमत्तेला झालेल्या नुकसानीच्या बदल्यात हा क्लेम मिळतो. विमा क्लेम करण्याची प्रक्रिया एलपीजी गॅस सिलिंडरमुळे तुमच्या घरात कोणतीही घटना घडली असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही सर्वप्रथम तुमच्या गॅस कंपनीच्या डिस्ट्रिब्युटरला कळवावे. यानंतर, डिस्ट्रिब्युटर या प्रकरणाची चौकशी करेल आणि विमा कंपनीला त्याबद्दल माहिती देईल. यानंतर कंपनी अपघातानुसार ग्राहकाला क्लेम देईल. New IPO : LIC नंतर ‘या’ 3 आयपीओंमधून गुंतवणूकदारांना कमाईची संधी, पुढील आठवड्यात ओपन होणार विम्याचा दावा करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक » अपघाती मृत्यूचे प्रमाणपत्र. » पोस्टमॉर्टम रिपोर्ट. » तपासणी अहवाल » रुग्णालयात दाखल करण्याचे प्रिस्क्रिप्शन. » मेडिकल बिल. » रुग्णाचे डिस्चार्ज कार्ड.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या