मुंबई, 9 नोव्हेंबर : एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) आता त्यांच्या सदस्यांना ‘Date Of Exit’ मॅन्युअली अपडेट करण्याची परवानगी देते. जर तुम्ही नोकरी सोडली असेल किंवा बदलत असाल तर तुम्ही संस्थान (Employer), बाहेर पडण्याची तारीख (Date Of Exit), नोकरी सोडण्याचे कारण यासारखी माहिती अपडेट करू शकता. दुसर्या संस्थेत सामील होण्यास विलंब होत असल्यास, तरीही तुम्ही तुमचे खाते अपडेट करू शकता. EPF शी संबंधित अनेक सुविधांसाठी, एक्झिट डेट मार्क असणे आवश्यक आहे. पूर्वी, केवळ कंपनीला बाहेर पडण्याची तारीख चिन्हांकित करण्याचा अधिकार होता. जर कंपनीने ‘एक्झिटची तारीख’ मार्क केली नसेल, तर कर्मचारी गरजेनुसार पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाहीत (PF Account Withdrawal ). पीएफ खाते ट्रान्सफर देखील शक्य नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा कर्मचारी आणि कंपनी दोघांचे योगदान (Contribution) थांबते तेव्हा बाहेर पडण्याची तारीख अपडेट केली जाते. कंपनीने एखाद्याच्या पीएफ खात्यात केलेल्या शेवटच्या कॉन्ट्रिब्युशनच्या दोन महिन्यांनंतरच हे मार्क केले जावे गरजेचं असतं. ‘डेट ऑफ एक्झिट’ अपडेट करण्याची प्रक्रिया » https://unifiedortal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाइटवर जा. » युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि पासवर्डने लॉग इन करा. » मॅनेज वर जा आणि मार्क एक्झिट वर क्लिक करा. » सिलेक्ट एम्प्लॉयमेंट ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि तुमचा EPF खाते क्रमांक निवडा. » Date Of Exit आणि बाहेर पडण्याचे कारण एंटर करा. » OTP साठी विनंती करा आणि तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा. »चेक बॉक्सवर खूण करा - मी खाली दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचले आहेत. » आता ‘अपडेट’ वर क्लिक करा. » आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक पॉप-अप मेसेज मिळेल. ज्यामध्ये असे लिहिलेले असेल - “डेट ऑफ एक्झिट यशस्वीपणे अपडेट केली आहे”. » प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओके बटणावर क्लिक करा.