JOIN US
मराठी बातम्या / मनी / EPFO अकाउंट असणाऱ्यांनी 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा करावा लागेल पश्चाताप

EPFO अकाउंट असणाऱ्यांनी 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा करावा लागेल पश्चाताप

पुढील दोन दिवसांत म्हणजे 31 मार्चपूर्वी, EPFO ​​च्या सदस्यांनी त्यांच्या खात्यात नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील भरणे आवश्यक आहे. अन्यथा, तुमचे पीएफचे पैसे अडकू शकतात. तुम्ही हे काम न केल्यास ३१ मार्चनंतर तुम्ही पीएफ पासबुक ऑनलाइन तपासू शकणार नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मार्च : दरवर्षी 31 मार्च ही तारीख खूप महत्त्वाची असते. नेहमीप्रमाणे यंदाही ही तारीख खूप महत्त्वाची असून त्यापूर्वी तुम्हाला बरीच कामं पूर्ण करावी लागणार आहेत. आधार-पॅन कार्ड लिंक करणं, केवायसी करणं ही महत्त्वाची कामं तुम्हाला 31 मार्च या तारखेच्या आत पूर्ण करायची आहेत. या गोष्टी न केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. त्याचप्रमाणे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठीही 31 मार्च ही तारीख महत्त्वाची आहे. पुढील दोन दिवसांत म्हणजे 31 मार्चपूर्वी, EPFO च्या सदस्यांनी त्यांच्या खात्यात नॉमिनी व्यक्तीचे डिटेल्स भरणं आवश्यक आहे. असं न केल्यास तुमचे पीएफचे पैसे अडकू शकतात. तुम्ही हे काम न केल्यास 31 मार्चनंतर तुम्ही पीएफ पासबुक ऑनलाईन तपासू शकणार नाही. त्यामुळे दोन दिवसांत हे काम आठवणीने करून घ्या. ऑनलाईन नॉमिनी निवडू शकता तुम्ही EPFO वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन तुमचा नॉमिनी निवडू शकता. पीएफ खातेधारक नॉमिनीचे नाव त्यांना पाहिजे तितक्या वेळा बदलू शकतात. ईपीएफओने ही सुविधा खातेधारकांना दिली आहे. ईपीएफओच्या मते, ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. ईपीएफओने यूट्यूबवर नॉमिनी भरण्याचे डिटेल्सही शेअर केले आहेत. 7th Pay Commission DA Hike : मोदी सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना दिलं ’ मोठं गिफ्ट’, महागाई भत्त्यात भरघोस वाढ नॉमिनी नोंदवण्याची प्रक्रिया 1. सब्सक्रायबर्स नॉमिनेशन ऑनलाईन भरण्यासाठी, सर्वात आधी EPFO वेबसाईट epfindia.gov.in वर जा. यानंतर, सर्व्हिस ऑप्शनवर जा आणि ड्रॉपडाउनमधील for employees हा ऑप्शन निवडा. यानंतर, तुम्हाला सदस्य UAN/Online Service (OCS/OTCP) वर क्लिक करावं लागेल. 2. पेज ओपन झाल्यानंतर तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. तुमचं फॅमिली डिक्लेयरेशन अपडेट करण्यासाठी Yes वर क्लिक करा. नंतर पुढे जाऊन, Add Family Details वर क्लिक करा. यामध्ये, नॉमिनेशन डिटेल्सवर क्लिक करून सामायिक करायची एकूण रक्कम टाका. 3. नंतर Save EPF Nomination वर क्लिक करा. OTP जनरेट करण्यासाठी E-Sign वर क्लिक करा. ग्राहकाच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. OTP सबमिट करा आणि तुमचे ई-नॉमिनेशन रजिस्टर होईल. 4. या EPF मध्ये एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडले जाऊ शकतात आणि यासाठी कोणतीही कागदपत्रं सादर करण्याची आवश्यकता नाही. तर, तुमचे EPF अकाउंट असेल आणि तुम्ही तुमचे नॉमिनी निवडले नसतील तर आठवणीने या दोन दिवसांत म्हणजेच 31 मार्चच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अन्यथा तुम्हाला पीएफ पासबुक ऑनलाईन तपासता येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या