JOIN US
मराठी बातम्या / मनी / Elon Musk ने ट्विटरमध्ये खरेदी केली 9.2% हिस्सेदारी, जाणून घ्या काय आहे प्लॅन

Elon Musk ने ट्विटरमध्ये खरेदी केली 9.2% हिस्सेदारी, जाणून घ्या काय आहे प्लॅन

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे (Tesla) सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये (Twitter) 9.2 टक्के हिस्सा विकत घेतला आहे.

जाहिरात

Elon Musk

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 4 एप्रिल : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये (Twitter) 9.2 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या नियामक सूचनेनुसार, मस्कने ट्विटरचे सुमारे 7.35 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. मस्कच्या ट्विटरमधील ही भागीदारी निष्क्रिय गुंतवणूक मानली जात आहे. याचा अर्थ त्याला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूकदार राहायचे आहे. सोशल मीडिया कंपनीतील ही हिस्सेदारी खरेदी केल्यानंतर सोमवारी ट्विटरच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्याच वेळी, टेस्लाच्या स्टॉकमध्येही किरकोळ वाढ झाली. उल्लेखनीय आहे की, मुक्तपणे बोलण्याबाबत ट्विट करताना मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटरच्या मोकळेपणाने संवाद साधण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. Fact Check: आता घर आणि दुकानांच्या भाड्यावरही 12 टक्के GST भरावा लागणार? जीएसटी कौन्सिल बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार? ते म्हणाले होते, “कार्यक्षम लोकशाहीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे. ट्विटर या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करते यावर तुमचा विश्वास आहे का?’’ दुसर्‍या ट्विटमध्ये मस्क म्हणाले की, नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार “गंभीरपणे” करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या