JOIN US
मराठी बातम्या / मनी / Doorstep Banking मध्ये कोणत्या सुविधा मिळतात, बँक त्यासाठी किती पैसे घेते?

Doorstep Banking मध्ये कोणत्या सुविधा मिळतात, बँक त्यासाठी किती पैसे घेते?

या डोअरस्टेप सेवेत ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळणार आहे आणि किती चार्ज घेणार आहे याबाबत जाणून घेऊया.

जाहिरात

_bank

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : काहीवेळा बँकेत जाणं शक्य होत नाही, वयोवृद्धांना बँकेत तासंतास उभं राहायला लागू नये म्हणून खास डोअरस्टेप सेवा सुरू केली आहे. या डोअरस्टेप सेवेत ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळणार आहे आणि किती चार्ज घेणार आहे याबाबत जाणून घेऊया. अनेकांना बँकेत जाणे, तासनतास आपल्या वळणाची वाट पाहणे अवघड झाले आहे. ही अडचण दूर करण्यासाठी बँकांनी डोअर स्टेप सेवा सुरू केली आहे. अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग ग्राहकांना होम बँकिंग सेवा देत आहेत. डोअरस्टेप बँकिंग सेवेद्वारे, ग्राहक आता बँकेने नियुक्त केलेल्या एजंटद्वारे घरी बसून बँकेशी संबंधित काम करू शकतात.

डोअर स्टेप बँकिंग सेवांमध्ये खाते उघडणं, रोख रक्कम जमा करणे, पैसे काढणे, मनी ट्रान्सफर इत्यादींचा समावेश होतो. काही बँका या सेवेसाठी शुल्क आकारतात तर काही बँका ही सेवा ज्येष्ठ नागरिकांना मोफत देतात. SBI, HDFC बँक, ICICI बँक, कॅनरा बँक डोअर स्टेप बँकिंग सेवेसाठी किती रक्कम घेतात ते जाणून घेऊया.

काय सांगता! या पाणी बॉटलच्या किंमतीत येईल ऑडी कार, यात काय आहे एवढं खास?

HDFC बँकेनं दिलेल्या वेबसाईटनुसार 70 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांसाठी पुढील शुल्क आकारले जाणार आहेत. कॅश पिकअप- 200 रुपये अधिक टॅक्स रोख देणी- 200 रुपये अधिक टॅक्स इन्स्ट्रूमेंट पिकअप - 100 रुपये अधिक टॅक्स जर तुम्ही सध्याचे बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही घरबसल्या बँकिंग सेवेचा सहज लाभ घेऊ शकता. अर्ज करण्यासाठी, तुमच्या बँकेच्या फोन बँकिंग क्रमांक 1800 202 6161/1860 267 6161 वर कॉल करा. इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (IVR) तुम्हाला कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हकडे ट्रान्सफर करेल आणि तुम्ही डोरस्टेप बँकिंगसाठी नोंदणी करू शकता. डोरस्टेप बँकिंग सेवा बँकेच्या निवडक शाखांमध्ये दिल्या जातात.

‘या’ पिकातून करा लाखोंची कमाई, लागवडीचा खर्च फक्त 20 हजार; दुष्काळग्रस्त भागातही येते पीक

संबंधित बातम्या

कॉल सेंटर, मोबाईल अॅप आणि DSB वेू पोर्टलद्वारे तुम्ही या सेवांचा लाभ घेऊ शकता. ग्राहकांना प्रत्येक ट्रान्झाक्शनसाठी 75 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. GST पकडून 88.50 रुपये भरावे लागतील. ICICI बँक 70 वर्षांवरील व्यक्तींना कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या