सुनील शेट्टी
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टी आता फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक बिझनेसमन म्हणून ओळखला जाणार आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयासोबतच व्यावसायत पदार्पण केलं आहे. यामध्ये आता सुनील शेट्टीचं देखील नाव जोडलं जाणार आहे. सुनील शेट्टीने एका स्टार्टअप कंपनीत पैसे गुंतवले आहेत. सुनील शेट्टीने ज्या कंपनीत पैसे गुंतवले आहेत ती ते एक फूड डिलिव्हरी अॅप आहे. हे अॅप आता स्विगी आणि झोमॅटोला टक्कर देणार असल्याची चर्चा बाजारात रंगली आहे. या फूड डिलिव्हरी अॅपवर हॉटेल्स, रेस्टॉरंटची लिस्ट आहे. तुम्ही तुम्हाला हवं त्या हॉटेलमधून घरबसल्या ऑर्डर करू शकता. तुम्हाला हे अॅप डाऊनलोड करायचं आहे. त्यावर तुमचा नंबर अपलोड करून लोकेशन सेट करावं लागेल. त्यानंतर तुम्ही रेस्टॉरंट निवडून तिथून ऑर्डर करू शकता.
Aadhaar नंबरवरुन तुमचं बँक अकाउंट हॅक होऊ शकतं का? पाहा काय आहे सत्यइंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) द्वारे समर्थित मुंबईस्थित Waayu ने मुंबईत आपली सेवा सुरू केली आहे. यात मुंबई बीएमसी, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पालघरच्या बहुतांश भागातील रेस्टॉरंट्सचा समावेश आहे. मुंबईनंतर कंपनी इतर मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्येही हे अॅप सुरू करण्याच्या विचारात आहे. याबाबत सध्या कामं सुरू असून लवकरच लाँच होईल अशी ग्वाही ग्राहकांना दिली जात आहे. कंपनीने अभिनेता सुनील शेट्टीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे, याशिवाय, त्याच्याकडे कंपनीमध्ये इक्विटी देखील आहे. शेट्टी यांनी यापूर्वीही अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.
लोकांना नोकरी देणाऱ्या कंपनीचा कर्मचाऱ्यांना Email, एका रात्रीत सगळं संपलं अॅपवर 1500 हून अधिक रेस्टॉरंट्स डेस्टेक होरेकाचे अनिरुद्ध कोटगिरे आणि मंदार लांडे हे ‘वायू’ अॅपचे संस्थापक आहेत. सध्या, या अॅपवर 1500 हून अधिक रेस्टॉरंटची लिस्ट देण्यात आली आहे.25,000 हून अधिक डाउनलोडर्स आहेत. अॅप सध्या सर्व आऊटलेट्सकडून निश्चित शुल्क म्हणून प्रति महिना रु 1,000 आकारत आहे. हे शुल्क नंतर 2,000 रुपये केले जाऊ शकते. यासोबतच वायू अॅपला ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) शी जोडण्यासाठी प्लॅन तयार केला जात आहे.