JOIN US
मराठी बातम्या / मनी / Bitcoinsमध्ये तब्बल 1 कोटींची गुंतवणूक, पण समोरच्यानं Onlineच्या माध्यमातून गंडवलं, पुण्यातील घटना

Bitcoinsमध्ये तब्बल 1 कोटींची गुंतवणूक, पण समोरच्यानं Onlineच्या माध्यमातून गंडवलं, पुण्यातील घटना

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली.

जाहिरात

file photo

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 14 मे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेडिंग वेबसाईटवर गुंतवणूक केल्यानंतर एका व्यक्तीसोबत तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ट्रेडिंग वेबसाइटवरून गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणात त्याचा मोबदला मिळेल असे सांगत तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोबाईल आणि ईमेलद्वारे संपर्क करून ही फसवणूक करण्यात आली. हरिश्चंद्र राजाराम काळे (46, रा. वडगाव शेरी) यांनी सायबर पोलिसांना याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनंतर याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेडेक्स डॉट कॉम या ट्रेडिंग साईटमधून बोलत असल्याचे सांगून काळे यांचा विश्वास संपादन करण्यात आला होता. सदर वेबसाईटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा देण्याचे आमिष त्यांना देण्यात आले. त्यांनतर काळे यांच्याकडील एकूण 1 कोटी 12 लाख 60 हजार किमतीचे 2.7 बिटकॉईन्स घेतले. मात्र, बिटकॉईन्स घेतल्यावर त्याचा कोणताही परतावा देण्यात आली. इतकेच नव्हे तर संपर्क केला असता संबंधितांकडून प्रतिसादही देण्यात आला नाही. यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात डॅनियल कूपर आणि अलेक्झांडर हूडहेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील या करत आहेत. दरम्यान, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या