क्रेडिट कार्ड
मुंबई, 10 फेब्रुवारी : अनेकदा नोकरदार (employed) लोकांकडे एक किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट कार्डं (credit card) असतात. एखाद्या वस्तूची खरेदी (purchase) करण्यासाठी, फी, बिल भरण्यासाठी जेव्हा गरज असेल तेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करता येतो. पण पुढच्या महिन्यात जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची वेळ येते, तेव्हा बऱ्याचवेळा पैशाची चणचण असल्यामुळे मिनिमम पेमेंट (minimum payment) करून, पुढील महिन्यापर्यंत पेमेंट पुढे ढकलले (postpones) जाते. बऱ्याचवेळा पुढच्या महिन्यात क्रेडिट कार्डवर पुन्हा खरेदी केली जाते आणि पैशाची चणचण असल्याने पुन्हा एकदा मिनिमम पेमेंट भरण्याचा ऑप्शन निवडला जातो. तुम्हीही असे करत असाल तर सावधान (careful). कारण मिनिमम पेमेंट भरण्याचा ऑप्शन निवडल्यामुळे तुम्हाला भरपूर व्याज (interest) द्यावे लागते. तुम्ही बारकाईने पाहिल्यास, तुम्ही मिनिमम पेमेंट करत राहता, पण तुम्हाला भरायची असणारी क्रेडिट कार्ड बिलाची रक्कम कमी झालेली नसते. वाचा : RBI MPC Meeting: आर्थिक धोरणावर RBI चे मोठे निर्णय, तुमच्यावरही थेट परिणाम होणार 48 टक्क्यांपर्यंत व्याज तुम्ही क्रेडिट कार्डचं मिनिमम पेमेंट भरलं, तर तुम्हाला थकीत रकमेवर 2 ते 4 टक्के व्याज द्यावं लागेल. एका वर्षाचा विचार केल्यास हा व्याज दर वार्षिक 24 ते 48 टक्क्यांपर्यंत असतो. हा व्याजदर सर्व प्रकारच्या कर्जांपेक्षा महाग आहे. उदाहरणार्थ, वैयक्तिक कर्जावर तुम्ही वार्षिक 12 ते 15 टक्के व्याज भरता. गृहकर्जावर 7 ते 9 टक्के, वाहन कर्ज 8 ते 12 टक्के व्याज भरता. पण क्रेडिट कार्डवर तुम्हाला 48 टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते, हे तुम्हाला माहितीही नसते. त्यामुळे तुम्हीही मिनिमम पेमेंट भरत असाल तर आवज सावध व्हा आणि लवकरात लवकर पूर्ण पैसे भरून मोकळे व्हा. ईएमआयचा पर्याय जेव्हा तुमच्या क्रेडिट कार्डवर थकबाकी असते, तेव्हा पुढील खरेदीसाठी इंट्रेस्ट फ्री पीरियड दिला जात नाही. पहिल्या दिवसापासून पुढील खरेदीवर व्याज सुरू होते आणि मोठ्या प्रमाणात व्याज भरावे लागते. त्यामुळे जर तुम्हाला क्रेडिट कार्डचे संपूर्ण बील भरणे शक्य नसेल, तर ईएमआयद्वारे बील भरण्याचा पर्याय निवडा. यावर तुम्हाला वार्षिक फक्त 15 ते 18 टक्के व्याज द्यावे लागेल. वाचा : Ration Card मध्ये असा अपडेट करा Mobile Number, पाहा सोपी प्रोसेस वेळेवर बिल भरणे फायद्याचे जे ग्राहक वेळेवर बिल भरत नाहीत, ते क्रेडिट कार्ड कंपन्यांना आवडतात. बहुतेक कंपन्या त्यांच्या ग्राहकांना ई-मेल, एसएमएसद्वारे बिल भरण्याबाबत रिमाइंडर पाठवत असतात. अशा रिमाइंडर्सकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर बिल भरा. तसे न केल्यास थकबाकीवर व्याज आकारले जाते आणि दंडही भरावा लागतो. तसेच पुढील महिन्यात केलेली खरेदीही व्याजमुक्त नसते. तुमचा क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री खराब होते. यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा इतर क्रेडिट कार्ड घेण्याचा मार्ग बंद होऊ शकतो. क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करताना विविध ऑफर ग्राहकांना मिळत असतात. पण क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.