JOIN US
मराठी बातम्या / मनी / Rising India : केळ्याच्या खोडापासून तयार केल्या वस्तू, आज भारताबाहेरही कमवलंय नाव

Rising India : केळ्याच्या खोडापासून तयार केल्या वस्तू, आज भारताबाहेरही कमवलंय नाव

या दोरीचा वापर नंतर पर्यावरणपूरक पिशव्या, टोपल्या आणि बरेच काही बनवण्यासाठी केला जातो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलाक्कल : आतापर्यंत केळी खाण्यापर्यंतच आपल्याला त्याचा उपयोग माहिती होता. मात्र केळीच्या खोडाचा उपयोग अनेक ठिकाणी करतात. त्याच पाणी सर्वात जास्त असतं. याशिवाय त्याच्या खोडापासून दोरी तयार केली जाते. त्या दोऱ्यांपासून विविध प्रकारच्या वस्तू देखील तयार केल्या जातात. तामिळनाडूमधील मदुराई येथील मेलक्कल गावातून शाळा सोडलेल्या पीएम मुरुगेसन यांनी केळीच्या फायबरचे दोरीमध्ये रूपांतर करणारी मशीन विकसित केली आहे. दोरीचा वापर नंतर पर्यावरणपूरक पिशव्या, टोपल्या आणि बरेच काही बनवण्यासाठी केला जातो. मुरुगेसन यांनी सायकलच्या चाकाच्या रिम्स आणि पुली वापरून स्पिनिंग मशीन विकसित केले. मुरुगेसन यांच्या कल्पकतेमध्ये केवळ पर्यावरण सुधारण्याची क्षमता नाही, तर रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्याचीही क्षमता आहे.

त्यांनी तयाार केलेल्या वस्तूंची आज भारतच नाही तर जगभरात चर्चा होत आहे. त्यांनी केवळ स्वत: काम केलं नाही, तर गावातील लोकांना रोजगारही तयार केला. टाकावू पासून टिकावू आणि पर्यावरण पूरक अशा वस्तू असल्यानं त्यांच्या कामाचं कौतुक सगळीकडे होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या