JOIN US
मराठी बातम्या / मनी / जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा झटका, इंधनापाठोपाठ वाढले घरगुती गॅस सिलिंडरचे दर

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा झटका, इंधनापाठोपाठ वाढले घरगुती गॅस सिलिंडरचे दर

छोटासा दिलासा म्हणजे 19 किलो सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जुलै: एकीकडे कोरोनचं थैमान सुरू आहे तर त्यामध्ये इंधनाचे दर गगनला भिडत आहे. मंगळवार आणि बुधवारी पेट्रोल डिझेलचे दर स्थिर राहिल्यानं काहीसा दिलासा मिळाला असं वाटत असतानाच बुधवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. आधीच इंधनामुळे खिसा रिकामा होत असताना आता गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणींचं बजेटही कोलमडलं आहे. जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) एलपीजी गॅस सिलिंडर (एलपीजी गॅस सिलिंडर) च्या अनुदानाशिवाय किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 14.2 किलो विना अनुदानित LPG सिलिंडरची किंमत दिल्लीत 1 रुपये प्रति सिलिंडर महाग झाली आहे. आता नवीन दर 594 रुपयांवर पोहोचले आहेत. अन्य शहरांमध्येही आजपासून घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

कोलकातामध्ये 4 रुपये, मुंबईत 3.50 आणि चेन्नईत 4 रुपये महाग झाला आहे. मात्र, दिलासा म्हणजे 19 किलो सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. यापूर्वी, दिल्लीत जून महिन्यात दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत प्रति सिलेंडर 11.50 रुपये महाग झाली होती. त्याच वेळी मेमध्ये ते 162.50 रुपयांनी स्वस्त झाले. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या