JOIN US
मराठी बातम्या / विधानसभा निवडणूक 2014 / शुभा राऊळ यांचा सेनेला 'जय महाराष्ट्र', मनसेत दाखल

शुभा राऊळ यांचा सेनेला 'जय महाराष्ट्र', मनसेत दाखल

27 सप्टेंबर : ‘दौपद्रीची हाक ऐकणारा कुणी कृष्ण इथं भेटेल का ?’ अशी विचारणा करणार्‍या शुभा राऊळ यांना तो कृष्ण ‘कृष्णकुंज’ वर भेटलाय. कारण मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेमध्ये प्रवेश केला आहे. आमदार विनोद घोसाळकर यांचा त्रास होत असल्याची त्यांची अनेक दिवसांची तक्रार होती. तरीही शिवसेनेनं त्याची दखल न घेता घोसाळकरांनाच उमेदवारी दिल्याने त्या नाराज होत्या. त्यामुळे दहिसरच्या विकासासाठी आपण मनसेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

shubha raul 27 सप्टेंबर : ‘दौपद्रीची हाक ऐकणारा कुणी कृष्ण इथं भेटेल का ?’ अशी विचारणा करणार्‍या शुभा राऊळ यांना तो कृष्ण ‘कृष्णकुंज’ वर भेटलाय. कारण मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेमध्ये प्रवेश केला आहे. आमदार विनोद घोसाळकर यांचा त्रास होत असल्याची त्यांची अनेक दिवसांची तक्रार होती. तरीही शिवसेनेनं त्याची दखल न घेता घोसाळकरांनाच उमेदवारी दिल्याने त्या नाराज होत्या. त्यामुळे दहिसरच्या विकासासाठी आपण मनसेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शुक्रवारी रात्री त्यांनी ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसेत प्रवेश केला. ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून राज ठाकरे यांचं व्हिजन आपल्याला आवडल्याने आपण मनसेत आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी मनसे आमदार प्रवीण दरेकर यांनी शुभा राऊळ यांना दहिसरमधून उमेदवारी देत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता सेनेचे घोसाळकर विरुद्ध मनसेच्या डॉ. राऊळ असा थेट सामना रंगणार आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या