25 सप्टेंबर : अखेर शिवसेना आणि भाजपची 25 वर्षांची युती तुटली आहे. पण पाच पांडवाची महायुतीही यामुळे दुभंगली आहे. भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर मात्र घटकपक्षांना आपल्याच ताब्यात ठेवलं आहे. महायुतीमध्ये फूट पडल्यानंतर घटक पक्षांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष यांनी भाजपबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे खुद्द महादेव जानकर युती तोडण्याच्या पत्रकार परिषदेत हजर राहून भाजपसोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र रिपाइंने आपला निर्णय अजून गुलदस्त्यात राखून ठेवला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच कोणाबरोबर रहायचं याचा निर्णय उद्या घेऊ असं रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी सांगितलं. रात्री उशिरा रामदास आठवले आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा झाली त्यानंतर आठवलेंनी आपला निर्णय उद्यावर ढकलला आहे. आता शिवसेनेपासून वेगळं झाल्यानंतर भाजप आता 250 जागांवर लढणार आहे आणि मित्रपक्षांसाठी 38 जागा दिल्या आहेत. एकंदरीतच पाच पांडवाची महायुतीत महाफूट पडलीये आणि आता शिवसेना एकटी पडली असून भाजपच्या गडावर घटकपक्ष जमा झाले आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++