18 सप्टेंबर : महायुतीतला जागावाटपाचा तिढा चिघळतच चाललाय. भाजपचे अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूर आणि अहमदनगरमधल्या चौंडीमध्ये त्यांनी भाषण केलं. पण त्यांच्या भाषणात महायुतीचा उल्लेखच नव्हता.
महाराष्ट्र काँग्रेसमुक्त आणि भाजपयुक्त करण्याचं आवाहन मात्र यावेळी शहा यांनी केलं. आणि महाराष्ट्रात भाजपचंच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार केला.पंकजा मुंडेंच्या संघर्षयात्रेचा अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं समारोप झाला. त्यावेळी अमित शहांनी जागावाटपार चकार शब्दही काढला नाही. महायुतीवर भाष्य टाळून सेनेला शह देण्यासाठी भाजप हा दबावतंत्राचा मार्ग वापरत असल्याचं दिसतंय.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांची संघर्ष यात्रेचा समारोप पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मभूमीत झाला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी खणखणीत भाषण करून समर्थकांची मनं जिंकली. मी रडत बसली असती तर गोपीनाथ मुंडेंचा वारसा शोभले नसते म्हणून मैदानात उतरून लढतेय हा खरा गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे अशी भावना पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. तसंच महाराष्ट्रातील 43 टक्के उद्योग जर राज्याबाहेर गेलेत तर तरूण जगणार कसा ? तरुणांच्या हाताला रोजगार देणे गरजेचं आहे. या सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मारकाची दुरवस्था केलीये. त्यांच्या स्मारकाचा सन्मान नाही ठेऊ शकत तर तुमचा सन्मान काय ठेवणार असा खडासवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात काँग्रेसमुक्त आणि भाजपयुक्त सरकार व्हावं- शहा तर अमित शहा यांनी पंकजा यांच्या संघर्षयात्रेचं कौतुक केलं. पंकजा मुंडेची संघर्ष यात्रा आज संपतेय तर भाजपची परिवर्तन यात्रा आज सुरू होत आहे असं मत अमित शहा यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडेंच्या निधनाने महाराष्ट्राचं खूप नुकसान झालंय. मुंडे असते तर त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात निवडणूक लढवली असती. मुंडे हे जनतेचे, गरिबांचे नेते होते असं शहा म्हणाले. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 15 वर्ष महाराष्ट्रातील जनतेला लुटलंय. महाराष्ट्र काँग्रेसमुक्त आणि भाजपयुक्त सरकार व्हायला हवं, येणार्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचं सरकार बनणार आणि महाराष्ट्रातही परिवर्तन येणार असा विश्वास शहांनी व्यक्त केला. मात्र महायुतीच्या जागावाटपाबद्दल शहांनी बोलण्याचं टाळलं. आर.आर.पाटील पोपटपंची -फडणवीस या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना पोपटपंची करणारे गृहमंत्री असं म्हटलं. दरम्यान, पंकजा यांचं भाषण झाल्यानंतर यावेळी पंकजा मुंडे आता कसलेल्या नेत्याप्रमाणे वागू लागल्यात. चौंडी इथं संघर्ष यात्रेच्या सांगता सभेत याचा प्रत्यय आला. अगदी अधिकारवाणीनं त्यांनी जमलेल्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना शांत राहून अमित शहांचं भाषण ऐकण्याचं आवाहन केलं होतं. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++