12 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर आज वाजले. पण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कुठल्या जागेवर लढणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे. आपल्या मतदारसंघाचा घोळ 2 -3 दिवसांत सुटणार असून आपली इच्छा पक्षश्रेष्ठींना कळवली आहे, येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होईल, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ते पत्रकारांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रमाला आता खर्या अर्थाने सुरूवात होणार आहे. काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग अगोदरच फुंकले आहे. आज निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे 20 ते 27 सप्टेंबरच्या अगोदर अर्ज भरणे बंधनाकारक आहे. त्यामुळे आता उमेदवारांचे नाव जाहीर होणं हे सर्वच पक्षांचे प्रमुख काम असणार आहे. मात्र, आघाडी असो अथवा महायुती अजूनही जागावाटपाचा तिढा कायम आहे.
काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कुठून लढणार हे महत्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराडमधून निवडणूक लढवतील असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निरीक्षकांकडे केली होती. कराड हे मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड असल्यामुळे सेफ जागा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावर जाहीर भाष्य करण्याचं टाळलंय. पक्षश्रेष्ठी एक दोन दिवसांत निर्णय घेतील असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय. तसंच आघाडी सरकारनं केलेली विकासकामं बघता, जनता चौथ्यांदा आघाडीलाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करूनच निवणूक लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. इतर छोटेमोठ्या पक्षांचा फारसा फरक पडणार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मनसेला लगावला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++