06 सप्टेंबर : राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेले माजी वैद्यकीय मंत्री विजयकुमार गावित आज (शनिवारी) भाजपात प्रवेश करणार आहे. आज दुपारी भाजप प्रदेश कार्यालयात भाजप नेत्याच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दहा वर्ष राष्ट्रवादीसोबत असलेल्या विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला सुरुंग लावत राष्ट्रवादीचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं ते आता भाजपत प्रवेश करत आहेत.
गावित यांच्या भाजपप्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यावर असलेली राष्ट्रवादीची हुकूमत आता संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. लोकसभा निवडणुकीत विजयकुमार गावित यांची मुलगी हिना गावित हिनं भाजपमध्ये प्रवेश केला. मुलीच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीने गावित यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली होती. तसंच त्यांच्याकडे असलेलं वैद्यकीय मंत्रीपदही काढून घेतलं होतं. राष्ट्रवादीशी संबंध तुटल्यानंतर अखेरीस गावित आपल्या मुलीपाठोपाठ भाजपमध्ये दाखल होणार आहे. विशेष म्हणजे गावित यांच्या आदिवासी विकास खात्यातल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++