02 सप्टेंबर : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीत अजूनही जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. मात्र हा वाद बाजूला सारून शिवसेनेनं आपल्या 60 पैकी 44 उमेदवारांची यादी तयार केली आहे.
ही पहिली यादी 5 सप्टेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीत 44 आमदार आणि काही विभागप्रमुखांचा समावेश असण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिली. मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनाही उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर युतीला विधानसभाही टप्पात दिसू लागली. पण युतीत मुख्यमंत्रीपदाच्या वादावरुन ठिणगी पडलीये. युतीच्या नेत्यांना याचं खंडन केलं खरं पण धुसफूस सुरूच आहे. आता शिवसेनेनं जागावाटपाचा निर्णय होईल तेव्हा होईल पण आपल्याकडून तयारी सुरू केलीय.
शिवसेनेनं एकूण 60 उमेदवारांची यादी तयार केली आहे त्यापैकी 44 उमेदवारांना तिकीट देण्याचं ठरलंय. ही यादी येत्या 5 सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचं कळतंय. ज्या ठिकाणी आपल्या जागा आहेत अशा ठिकाणी शिवसेनेनं आपल्या उमेदवारांना तिकीट देणार असल्याचं कळतंय. मुंबईसह राज्यातील काही विभागप्रमुखांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांना देखील उमेदवारी देण्यात येणार अशी माहिती सूत्रांनी दिलीये. विधानसभेच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहे त्यामुळे शिवसेनेनं लवकरच प्रचाराला सुरूवात करावी अशी मागणी शिवसैनिक करत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++