मृत संघपाल सुभाष नरवाडे
(मनीष खरात, प्रतिनिधी) हिंगोली, 28 जुलै: राज्य सरकारकडून तरुणांसाठी आणि पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली होती. राज्यात तब्बल 7231 पोलीस शिपायांची भरती होणार आहे असं GR काढण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यामुळे राज्यातील तरुण प्रचंड जोमानं पोलीस भरतीच्या तयारीला लागले होते. मात्र हीच पोलीस भरतीची तयारी करत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. हिंगोली पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवकाचा रनिंग करताना ग्राउंडवर जागीच कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. संघपाल सुभाष नरवाडे, वय 23 वर्षे असे मयत युवकाचे नाव असून तो मूळचा वसमत शहरातील आंबेडकर नगर भागातील रहिवासी आहे. त्यांनी मला एक इंजेक्शन सिरिंज दिली आणि 30 विद्यार्थ्यांना…; लसीकरणादरम्यान घडला धक्कादायक प्रकार मागील काही महिन्यांपासून संघपाल हा हिंगोली शहरात बार्टीच्या अभ्यास केंद्रावर पोलीस भरतीचा अभ्यास करून आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर इतर सहकारी मित्रांसमवेत शारीरिक कसरत व रनिंगचा सराव करत होता. मात्र आज तो सरावाला आलं आणि रनिंग करताना तो अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे रनिंग करून थांबल्यावर त्याला चक्कर येऊ लागले आणि तो जागीच कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्यासोबत तयारी करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. संघपाल चे वडील हे भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात त्यामुळे आपला मुलगा पोलीस होऊन घराला हातभार यावेळी अशी त्यांचं स्वप्न होतं. मात्र संघपालच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मोठी बातमी! CLAT परीक्षेसाठीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर; वेबसाईट झाली अपडेट जिममधून किंवा रनिंग किंवा काही खेळताना अचानक मृत्यी झाल्याची ही काही पहिली घटना नाही. याआधीही असे अनेक तरुण जिममध्ये किंवा खेळाच्या मैदानावर मृत्युमुखी पडले आहेत. नुकतंच एका प्रसिद्ध अभिनेत्याचं क्रिकेट खेळताना निधन झालं. यामुळे व्यायाम शरीरासाठी चांगला मात्र तो योग्य प्रकारे केला तरच असं म्हणण्याची वेळ आली आहे.