JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुलाचा खून झालाय लवकर या! 112 नंबर 110 वेळा महिलेचा फोन, कोर्टानं सुनावली एवढी मोठी शिक्षा

मुलाचा खून झालाय लवकर या! 112 नंबर 110 वेळा महिलेचा फोन, कोर्टानं सुनावली एवढी मोठी शिक्षा

या महिलेनं असं का बरं केलं असावं? मुलाचा खून झालाय लवकर या! 112 नंबर 110 वेळा महिलेचा फोन, कोर्टानं सुनावली एवढी मोठी शिक्षा

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोंदिया : एका महिलेनं एकदा दोनदा नाही तर तब्बल ११० वेळा फोन करून खोटी माहिती दिल्याने तिला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत. या महिलेनं मुलाची हत्या झाल्याची खोटी माहिती ११२ नंबरवर दिली. सतत खोटी माहिती देत असल्याने अखेर यंत्रणेनं या महिलेला शोधायचा निर्णय घेतला. पोलिसांना एक अनोळखी नंबरवरून सतत फोन येत होता. या नंबरवरून एक महिला बोलत होती. ती महिला मुलाचा खून झाल्याचं पोलिसांना सांगायची. या महिलेनं ११२ नंबरवर ११० वेळा फोन करून जवळपास खोटी माहिती दिली. या प्रकरणी अखेर पोलिसांनी या महिलेला न्यायलयाची परवानगी घेऊन शोधून काढलं. पोलिसांनी न्यायालयाकडून तपास करण्याची परवानगी घेतली. सगळे पुरावे गोळा करून या महिलेला पोलिसांनी शोधून काढलं आणि न्यायालयात हजर केलं. या महिलेनं ११० वेळा कॉल करून खोटी माहिती दिल्याचं समोर आलं. त्यानंतर न्यायालयाने या महिलेला ६ वर्षांचा तुरुंगावस आणि ५०० रुपये दंड अशी शिक्षा दिली आहे. खोटी माहिती दिल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याने न्यायालयाने म्हटलं आहे. हा टोलफ्री नंबर नागरिकांच्या सोयीसाठी केला आहे. त्याचा गैरफायदा घेतल्याने या महिलेला शिक्षा झाली. मात्र या महिलेनं असं का केलं याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या