मुंबई, 22 जानेवारी : नागरिकत्व संशोधन कायद्यावरुन सध्या देशभरात वादंग सुरू असताना विविध नेत्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली आहे. जेव्हा मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, तेव्हा मोदी-शहांची माणसे इंग्रजांशी संधान बांधून आपल्याच देशबांधवांच्या विरोधात कारवाया करत होते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुंब्र्यातील शाहीन बाग येथील जनआंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी हे विधान केलं आहे. ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी मोदी-शहांसारखी म्हणताना त्यांनी संपूर्ण गुजराती समाजाला गद्दार ठरवले आहे. जे पद सरदार पटेलांनी भूषविले होते त्याच पदावर अमित शहांसारखी व्यक्ती बसली आहे, हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. इतरांची जन्मप्रमाणपत्र मागविण्याआधी मोदी यांनी आपल्या आईच्या जन्माचा दाखला आणावा, असे संतापजनक वक्तव्य केले आहे. जमावाला चिथविण्यासाठी केलेली विधानं वैयक्तिक पातळीवर केली जात असल्याचे बोलले जात आहे. शहा हे तुरुंगवास भोगून आले असल्याने त्यांनी या पदावर बसने हे अपमानजनक असल्याचं आजमी म्हणाले. LIC पॉलिसीधारकांसाठी मोठी बातमी! 31 जानेवारीपासून बंद होणार 23 प्लान सरदार पटेलांच्या जागेवर शहांची नेमणूक हे दुर्भाग्य सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यानंतरचे भारताचे पहिले गृहमंत्री असून त्यांनी राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिलं आहे. त्यांच्या जागेवर अमित शहा यांची नेमणूक करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याची जहरी टीका अबू आजमी यांनी शहांवर केली. मुंब्रा येथे जनतेला संबोधित करताना सर्व गुजराती समाजाला त्यांनी इंग्रजांचे दलाल म्हणून संबोधले.