तीन दिवस पावसाचा अंदाज
मुंबई : तीन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर पावसानं थोडी उसंत घेतली खरी, पण तरीही अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. लाँग विकेण्डची मजा घेण्यासाठी तुम्ही जर प्लॅन करत असाल तर तुमचा प्लॅन चौपट होऊ नये यासाठी हवामान विभागाने दिलेला हा अलर्ट (IMD) तुम्हाला माहिती असायला हवा. तुम्ही जर लाँग विकेण्डचा (Long Weekend) प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. हवामान विभागाने पुढचे 5 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पुढचे चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 13 आणि 14 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती जिल्हांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये 14 ऑगस्ट रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव परिसरात पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तुम्ही जर लाँग विकेण्डसाठी जर कुठेही प्लॅन करत असाल, तर हवामान विभागाच्या या अलर्टकडे दुर्लक्ष करू नका.