JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 52 तास,पदार्थांचा घमघमाट,विष्णू मनोहरांचा विश्वविक्रम

52 तास,पदार्थांचा घमघमाट,विष्णू मनोहरांचा विश्वविक्रम

सलग 52 तास वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून विश्वविक्रम केलाय शेफ विष्णू मनोहर यांनी.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रवीण मुधोळकर, 23 एप्रिल : सलग काही तास एकच गोष्ट करायला सांगितली किंवा करावी लागली तर आपण कंटाळतो. पण सलग 52 तास वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून विश्वविक्रम केलाय शेफ विष्णू मनोहर यांनी. नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स असोसिएशनच्या सभागृहात सलग 50 हून अधिक तास येतोय वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा घमघमाट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या नावाचा जयघोष. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सलग 52 तास खाद्य पदार्थ तयार करण्याचा विक्रम रचलाय. या 52 तासांत त्यांनी 1001 पदार्थ बनवले आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या बेंजामिन पेरी याच्या नावावर सलग 40 तास खाद्य पदार्थ तयार करण्याचा विश्वविक्रम होता, तो विष्णू मनोहर यांनी मोडला. हॉटेलियर विठ्ठल कामत यांनीही विष्णू मनोहर यांचं अभिनंदन केलं. विष्णू मनोहर यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा मित्र परिवार आणि नागपुरकर मोठ्या संख्येनं या सभागृहात हजर होते, त्यांनी विष्णू मनोहर यांच्या या विश्वविक्रमाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अत्तापर्यंत सलग अनेक तास खाद्यपदार्थ बनवण्याचा विश्वविक्रम अमेरिकन शेफच्या नावावर होता. आता मात्र तो विश्वविक्रम एका भारतीयाच्या, विदर्भवासी शेफ विष्णू मनोहर यांच्या नावावर नोंदवला गेला. त्यामुळे त्यांचं जगभर कौतूक होतंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या