JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या अपघाताचा ट्रक सापडला, ड्रायव्हरला अटक

Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या अपघाताचा ट्रक सापडला, ड्रायव्हरला अटक

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचं आज पहाटे रस्ते अपघातात निधन झालं. मेटे यांच्या अपघाताला जबाबदार असलेल्या ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचं आज पहाटे रस्ते अपघातात निधन झालं. मेटे यांच्या अपघाताला जबाबदार असलेल्या ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ट्रक ड्रायव्हरचं नाव उमेश यादव असल्याचं सांगितलं जात आहे. हा ट्रक पालघर जिल्ह्यातील कासा इथला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या ट्रकचा नंबर DN 09 P 9404 आहे, तसंच हा ट्रक आयसरचा असल्याचंही समजतंय. हा ट्रक पालघरचा असून ट्रकच्या मालकाने ड्रायव्हरची ओळख पटवली आहे. ट्रक मालकाने ओळख पटवल्यानंतर पालघर पोलीस मालकाला घेऊन गुजरातच्या वापीला रवाना झाले. वापीमधून या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांचं निधन झालं होतं. अपघात झाल्यानंतर ट्रक ड्रायव्हर तिकडून पळून गेला होता. अपघाताचा आणि ट्रक चालकाचा तपास करण्यासाठी रायगड पोलिसांनी सहा टीम तयार केल्या होत्या. विनायक मेटे यांचं पार्थिव मुंबईहून बीडला आणण्यात येणार आहे. बीडमध्ये शिवसंग्रामच्या कार्यालयासमोर त्यांचं पार्थिव उद्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर मेटेंचं पार्थिव त्यांच्या घरी आणलं जाईल आणि शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. घातपाताचा संशय दरम्यान विनायक मेटे यांची आई आणि मराठा आंदोलनाच्या नेत्यांनी मेटे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. रविवारी दुपारी 4 वाजता बैठक ठरली होती, पण मेटेंना मंत्रायलायतून बैठक 12 वाजता होणार असल्याचं सांगण्यात आलं. बैठकीची वेळ का बदलण्यात आली? मंत्रालयातून नेमका फोन कोणी केला? असा संशय मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे शिवसेनेनंही मेटेंच्या अपघाती मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे. शिंदे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा मेटे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मेटे यांना कोणी फोन करून बोलावले, याची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. विनायक मेटे यांच्या आईनेही त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या