JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुला-मुलीनंतर नवनीत राणादेखील Corona पॉझिटिव्ह, समोर आले धक्कादायक रिपोर्ट

मुला-मुलीनंतर नवनीत राणादेखील Corona पॉझिटिव्ह, समोर आले धक्कादायक रिपोर्ट

खासदार नवनीत राणा (Navneet rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi rana) यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 06 ऑगस्ट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे खासदार नवनीत राणा (Navneet rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi rana) यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं अहवाल आल्यानंतर स्पष्ट झालं आहे. या सदस्यांमध्ये राणांच्या मुलांचाही समावेश आहे. आणि आज नवनीत राणा यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या बातमीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पती आमदार रवी राणा हे नागपूरला त्यांच्या आई वडिलांच्या सेवेत आहेत. अशात नवनीत आणि रवी राणा यांच्या मुलाला आणि मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय नवनीत राणा यांचे सासू-सासरे म्हणजे रवी राणा यांचे आई वडील नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी आहे. बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांचे वडील आणि खासदार नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट कालच पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत 10 जणांना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये आमदार-खासदार पती-पत्नींच्या मुलांचा समावेश आहे.

आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी आणि लक्षणं असल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन कऱण्यात आलं आहे. चुकीच्या सँपलमुळे घोळ या आधी रवी राणा आणि नवनीत राणा यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र, राणा दाम्पत्यांचं चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत आमदार रवी राणा यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे तक्रार केली होती. आमदार रवी राणा यांना ताप आल्याने अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब जिल्हा कोविड रूग्णालयाच्या टीम मार्फत घेण्यात आले होते. हे स्वॅब तपासणीसाठी नागपूर येथील AIIMS मध्ये पाठवण्यात आले होते. मात्र, स्वॅब सॅम्पल चुकीचे असल्याचे AIIMS तज्ज्ञ डॉ. मीना यांनी खासदार नवनीत राणा यांना फोन करून माहिती दिली होती. तसेच त्यांचे सॅम्पल परत पाठवण्यास सांगितले होते. यापूर्वीही 40 ते 45 स्वॅब हे चुकीच्या पद्धतीने घेतल्याने ते नागपूर येथील AIIMS ने रिजेक्ट केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या